मुंबई 7 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्याला नेहमी असे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. ज्यामुळेच हे व्हिडीओ पाहण्यात लोकांचा तासनतास कसा निघून जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप जास्त ट्रेंड होत आहे. हा व्हिडीओ दोन मुलींच्या भांडणाचा आहे. तसे पाहाता आपल्या भारतीय लोकांसाठी भांडणं हा प्रकार तसा नवीन नाही. नेहमीच रस्त्यावर, ट्रेनमध्ये भांडणं ही होत राहातात आणि लोकांना देखील भांडणं पाहायला फार आवडतात. भांडणं पाहाणं हे बहुतांश लोकांसाठी मनोरंजक काम आहे. परंतू सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ भारतातील नाही तर परदेशातील आहे. यामध्ये दोन परदेशी मुली एकमेकांशी भांडत आहेत, तेही अगदी भारतीय स्टाईलने. हो, या मुली एकमेकांच्या अंगावर जात एकमेकांचे केस खेचत आहेत, तसेच ते मारहाण देखील करत आहे. या व्हिडीओमध्ये ‘पप्पाच्या परी’मध्ये भांडण होताना दिसत आहे. त्याच वेळी त्यांचे मित्र प्रेक्षक म्हणून या भांडणाची मजा घेत आहेत. व्हिडीओमध्ये काही मुलांच्या हसण्याचा देखील आवज येत आहे. पार्श्वभूमीतून मुलीच्या हसण्याचा आवाजही येत आहे. यावरून या भांडणाऱ्या मुलींना पाहून त्यांचे मित्र आनंद लुटत असल्याचे दिसून येते. हे वाचा : Viral video : महिलेच्या कानात शिरला साप, पिवळ्या सापाचा व्हिडीओ पाहून सर्वच हैराण या मुलीचे कपडे पाहून हा व्हिडीओ एका शाळेतील असावा असे दिसत आहे. मात्र, हे भांडण कशामुळे झालं हे काही कळू शकलेलं नाही.
हा व्हिडिओ Only The Best Fights! या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी फारच आवडला आहे. अनेक लोक यावर मजेदार कमेंट देखील करत आहेत. त्यावर एका युजरने म्हटलं आहे की, ‘‘मुली या मुली असतात मग त्या भारतातील असोत किंवा विदेशातील.’’ हे वाचा : 3 सेकंदात 50 फुटावरुन खाली कोसळलं स्काय स्विंग; लोक जमिनीवर आदळून उडाले, धक्कादायक VIDEO हा व्हिडीओ जवळपास 20 लाख वेळा पाहिला गेला आहे. तर अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत.