मुंबई, 23 ऑगस्ट : आपण सध्या दिवसभर बातम्यांनी वेढलेले असतो. कधी राजकीय तर कधी गुन्हेगारीच्या बातम्या आपल्या पुढे येऊन सादर होतात. त्यामुळे अनेकदा मन निराश होतं. पण सकारात्मक बातम्याही (inspirational stories) सध्या इंटरनेटमुळे पटकन व्हायरल होतात. कडक उन्हात पोटावरच्या लहान मुलांच्या कॅरिअर बॅगमध्ये बसलेली लहानगी आणि सोबत लहान मुलाला घेऊन फूड डिलिव्हरी करायला दारात आलेल्या झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. तो इंटरनेटवरील युजर्सना खूप आवडला असून तो जवळजवळ 10 लाख वेळा पाहिला गेला आहे. एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त देण्यात आलंय. फूड ब्लॉगर सौरभ पंजवानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या घरी फूडची डिलिव्हरी (Food Delivery) देण्यासाठी आलेल्या व्यक्तीसोबत त्याची लहानगी मुलगी आणि मुलगाही आहेत. हे पाहून कर्तव्यनिष्ठा आणि प्रेरणा मिळाल्याचं पंजवानी यांना आपल्या फॉलोअर्सना सांगायचंय. त्यांनी कमेंटमध्ये लिहिलंय, ‘ मला या व्यक्तीला पाहून खूप प्रेरणा मिळाली. हा झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर (Zomato Delivery Partner) दिवसभर उन्हात आपल्या दोन मुलांना घेऊन पदार्थांची डिलिव्हरी करतो आहे. जर एखाद्याने ठरवलं तर तो काहीही करू शकतो हेच आपल्याला यातून शिकण्यासारखं आहे.’ टॅलेंट पाहून आनंद महिंद्रांनी ट्विटरवरच दिली नोकरीची ऑफर; तरुणाने असं केलंय तरी काय? या व्हिडिओत एका डिलिव्हरी बॉयच्या पोटावर लहान मुलांची कॅरिअर बॅग आहे. ज्यामध्ये त्याची लहान मुलगी बसली आहे. तसंच त्या व्यक्तीच्या मागे त्याचा लहान मुलगा उभा आहे. असं दिसतंय पंजवानी त्याला विचारतात, ‘तुम्ही मुलांनासोबत घेऊन डिलिव्हरी करता?’ त्यावर तो डिलिव्हरी बॉय हो असं उत्तर देतो. त्यावर पंजवानी म्हणतात, ‘ This is call Dedication. तुमचं नाव काय?’ त्यानंतर डिलिव्हरी बॉय नाव सांगतो. पंजवानी म्हणतात, ‘काम करत रहा पण मुलांना घेऊन उन्हात फिरू नका.’ तो डिलिव्हरी बॉय हो म्हणतो आणि डिलिव्हरी फूड त्यांच्या हातात देतो असं या व्हिडिओत दिसतंय. हा व्हिडिओ आतापर्यंत 1,034,724 जणांनी लाईक केला असून 10 लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. तसंच झोमॅटोनेही त्या डिलिव्हरी बॉयच्या मुलांसाठी कंपनीकडून उपलब्ध योजनांची माहिती देण्यासाठी त्या बॉयची माहिती सोशल मीडियावर विचारली आहे. ‘कृपया आपल्या ऑर्डरची (Order) माहिती प्रायव्हेट मेसेजने द्यावी जेणेकरून आम्ही डिलिव्हरी पार्टनरशी संपर्क करून त्याला मदत करू शकू,’ असं झोमॅटोने कमेंटमध्ये म्हटलंय. इलॉन मस्क यांचा पुणेकर मित्र पोहोचला थेट अमेरिकेत, कशी होती जगातील श्रीमंत व्यक्तीसोबतची भेट? या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाने म्हटलंय, ‘ जगणं खूप सुंदर आहे पण कष्टाचं आहे.’ दुसरा म्हणतो, ‘ अशा व्यक्ती परिस्थितीला नावं न ठेवता असं काही करता जेणेकरून त्यांच्या आयुष्याला वेगळाच अर्थ निर्माण होतो. मला अशा विशेष व्यक्तींबद्दल खूप आदर वाटतो. तसंच ज्यांच्याकडे केवळ निष्ठापूर्वक कामाची कुवत आहे अशा व्यक्तींना झोमॅटोने संधी दिली याचंही मला कौतुक वाटतं.’ एकानी म्हटलंय, ‘वडिलच खरे हीरो असतात.’ दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला राहुल मित्तल यांनी इंटरनेटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात एका फूड डिलिव्हरी बॉयचं वय फक्त 7 वर्षं आहे पण फूड डिलिव्हरी कंपनीने त्याचं वय 14 दाखवून त्याला काम दिलं आहे कारण त्याच्या वडिलांच्या अपघाती मृत्युनंतर उदनिर्वाहाची जबाबदारी या मुलावर पडली आहे. यावर टीकाही झाली होती पण त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून कंपनी काही कारवाई करत नसल्याचं सांगितलं गेलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.