मराठी बातम्या /बातम्या /Viral /

जिवंतपणी नाही पण मरणानंतर झाले एक; गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी केलं लग्न; कारण वाचून डोळ्यांत येईल पाणी

जिवंतपणी नाही पण मरणानंतर झाले एक; गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी केलं लग्न; कारण वाचून डोळ्यांत येईल पाणी

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी केलं लग्न

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी केलं लग्न

दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता; पण त्याआधीच बॉयफ्रेंडचा मृत्यू झाल्याने तिला हे पाऊल उचलावं लागल्याचं तिनं म्हटलं आहे.

मुंबई, 13 जून: प्रेम आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं, असं म्हटलं जातं. प्रेमात असणारी व्यक्ती तिच्या जोडीदारासाठी काहीही करू शकते. याची अनेकदा प्रचितीही येते; पण एका तरुणीने तर चक्क मृत बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबतच (Boy Friend) लग्न केलं. तिने आपली अनोखी भावनिक प्रेमकथा नुकतीच शेअर केली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता; पण त्याआधीच बॉयफ्रेंडचा मृत्यू झाल्याने तिला हे पाऊल उचलावं लागल्याचं तिनं म्हटलं आहे.

‘आज तक’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. ‘मेट्रो’ने दिलेल्या माहितीनुसार, क्लिओढना कासग्रोव्ह (Cliodhna Cosgrove) व मार्क अमोस (Marc Amos) हे दोघे 2018 पासून रिलेशनशिपमध्ये होते. कासग्रोव्हचा सांभाळ करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मार्क 3 दिवस तिच्यासोबत होता. त्याच वेळी त्यांचं नातं घट्ट झालं होतं. काही काळानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु काही महिन्यांतच मार्कला ‘सिव्हीड’ (Common Variable Immunodeficiency) हा दुर्धर आजार असल्याचं निष्पन्न झालं. यामुळे त्याचं फुफ्फुस खराब झालं होतं. 2019 मध्ये कासग्रोव्हचा 27वा वाढदिवस होता. त्या वेळी मार्कने गुडघे टेकवून प्रपोझ केल्याचं तिने सांगितलं. त्या वेळी मार्कने एक अंगठी दिली होती. ती त्याने बरेच दिवस आपल्या कारमध्ये ठेवली होती, असंही ती म्हणाली.]

नवीन कोरोना रुग्णांमध्ये दिसतायत वेगळे 3 प्रकार; घसादुखीतील झालेला बदल त्रासदायक

कासग्रोव्ह म्हणाली, की आम्ही तीन बाळांना जन्म देण्याचं नियोजन करत होतो. परंतु मार्कला आजार झाल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागला. मार्कला आपल्या प्रजननक्षमतेबद्दल (Fertility) चिंता वाटू लागली. परंतु त्यांनी आई-वडील होण्याची आशा कदापि सोडली नाही. काही काळानंतर म्हणजेच 18 फेब्रुवारी 2021 रोजी या जोडप्याला मुलगी झाली. तिचं नाव डार्सी असं ठेवण्यात आलं. परंतु याच महिन्यात मार्कच्या छातीत संसर्ग झाला. त्याचं रूपांतर न्यूमोनियात झालं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मार्कला फुफ्फसाशी संबंधित ‘ग्लिल्ड’ (Granulomatous Lymphocytic Interstitial Lung Disease) हा आजार असल्याचं समोर आले. मार्कजवळ जास्त वेळ नाही, ही बाब कासग्रोव्हच्या लक्षात आली. 6 जून रोजी जेव्हा मुलीचा नामकरण सोहळा होता, त्या वेळी फॅमिली फोटो घेण्यासाठी मार्कने एका बाजूची ब्रीदिंग ट्यूब (Breathing Tube) थोडी बाजूला केली. त्याच्या पुढच्याच आठवड्यात मार्कला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. 10 दिवसांनंतर तर मार्कची फुफ्फुसं निकामी झाल्याचं आणि हृदयाजवळ द्रवपदार्थ जमा झाल्याचं समोर आलं. नंतर त्याला पॅलिअ‍ॅटिव्ह केअरमध्ये शिफ्ट करण्यात आलं.

20 सप्टेंबर 2021 रोजी मार्कचा 26 वा वाढदिवस होता. याचदरम्यान मृत्यू जवळ आल्याचं त्याच्या कुटुंबीयांना जाणवू लागलं. पॅन मॅनेजमेंटसाठी (Pan Management) त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात जाताना तो ‘Ev’ry Time I Say Goodbuy By Ella Fitzgerald’ हे त्याचं आवडतं गाणं गात होता. तीन तासांनंतर त्याचा मृत्यू झाला.

एक टॅटू पूर्ण करण्याची आपली इच्छा असल्याचं सांगत कासग्रोव्हने फ्युनरल डायरेक्टरकडे परवानगी मागितली. मार्क जिवंत असेपर्यंत लग्न करण्याची संधी न मिळाल्याने त्यांनी पाद्रींकडे ब्लेसिंग सेरेमनी (Blessing Ceremony) करण्याची विनंती केली. त्यानंतर कासग्रोव्हने स्वत:ला आणि मार्कला अंगठी घातली. आयुष्यभर मार्कवर प्रेम करत राहणार असल्याची शपथ तिने घेतली. त्यानंतर तीन दिवसांनी मार्कच्या पार्थिव शरीराचा दफनविधी झाला.

कासग्रोव्हने म्हटलं आहे, की मार्कच्या मृतदेहाला अंगठी घातल्यानंतर आपण आता त्याचं आडनावही आपल्या नावाच्या मागे लावणार आहोत. मार्कचा मृत्यू झाला असला, तरी आजही आपण स्वत:ला त्याची पत्नी मानते, असं कासग्रोव्ह सांगते.

दाढी ठेवणाऱ्या पुरुषांसाठी फायदेशीर आहेत हे 3 फेसपॅक; ब्राइट आणि फ्रेश स्कीन

दरम्यान, मृत्यूनंतरही कासग्रोव्ह मार्कवरचं खरं प्रेम कधी विसरली नाही. मार्क सोबत नसला तरी त्याच्या आठवणी तिच्या व मुलीसोबत असल्याचं ती सांगते. मार्कच्या मृत्यूआधी तिने त्याच्यासोबत अनेक क्षण घालवले आणि त्याचे सुंदर असे व्हिडिओही बनवले आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून जपलेल्या या आठवणी ती आजही आपल्या मुलीला दाखवत असते आणि हे प्रेम आयुष्यभर विसरता येणार नाही, असंही कासग्रोव्ह म्हणते.

First published:

Tags: World news