मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दाढी ठेवणाऱ्या पुरुषांसाठी फायदेशीर आहेत हे 3 फेसपॅक; स्कीन राहील ब्राइट आणि पिंपल फ्री

दाढी ठेवणाऱ्या पुरुषांसाठी फायदेशीर आहेत हे 3 फेसपॅक; स्कीन राहील ब्राइट आणि पिंपल फ्री

ज्या पुरुषांच्या चेहऱ्यावर दाढी आहे, त्यांच्यासाठी त्वचेची काळजी घेणे अवघड असते. यासाठी आम्ही काही सोप्या फेस पॅकची माहिती देत ​​आहोत जे तुम्ही सहज वापरू शकता. अनेक स्कीन प्रॉब्लेमवर त्याचा फायदा होईल.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 जून : अनेक लोकांना असे वाटते की, त्वचेची काळजी फक्त महिलांसाठीच आवश्यक आहे. पण, पुरुषही आपल्या स्कीन केअरसाठी वेळ देत आहेत आणि ते आवश्यकही आहे. पुरुषांनी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढून आपल्या त्वचेची काळजी घेण्याचा नक्कीच विचार करायला हवा. खरं तर, उष्णता, प्रदूषण, धूळ आणि घामामुळे त्वचेची छिद्रे ब्लॉक होतात आणि ती खोलवर साफ न केल्यास चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरुमांच्या समस्या सुरू होतात. मात्र, ज्या पुरुषांच्या चेहऱ्यावर दाढी आहे, त्यांच्यासाठी त्वचेची काळजी घेणे अवघड असते. यासाठी आम्ही काही सोप्या फेस पॅकची माहिती देत ​​आहोत जे तुम्ही सहज वापरू शकता आणि ते वापरून तुमची त्वचा झटपट चमकदार आणि प्रेझेंटेबल (Face Packs For Men With Beard) दिसेल.

दाढी असलेल्या पुरुषांसाठी फेस पॅक

मुलतानी माती आणि गुलाबजल -

मुलतानी माती तुमची त्वचा खोलवर स्वच्छ करण्याचे काम करते आणि गुलाबपाणी चेहऱ्याला मॉइश्चरायझ करते. हे वापरणे खूप सोपे आहे आणि तुम्ही हा फेस पॅक दर 15 दिवसांनी एकदा चेहऱ्यावर लावू शकता. हे करण्यासाठी तुम्ही एका भांड्यात एक चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात गुलाबपाणी टाकून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट ज्या ठिकाणी दाढी नाही अशा सर्व ठिकाणी लावा. तुम्ही दाढीवर देखील लावू शकता. पूर्णपणे कोरडे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा चांगला धुवा.

हे वाचा - 40 नंतर महिला अशा जाडजुड का बरं होतात? एक्सपर्टसने सांगितले कारण आणि उपाय

कॉफी पॅक आणि दही -

कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, त्वचेच्या विविध समस्या कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो, तर दह्यामध्ये असलेले प्रोटीन त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि पोषण देते. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा फिल्टर केलेली कॉफी घ्या आणि त्यात एक चमचा दही घाला. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखरही टाकू शकता. यामुळे तुमची त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत होईल. आता हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेला चांगले लावा. हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवा. तुमच्या चेहऱ्यावर झटपट चमक येईल.

हे वाचा - 40 नंतर महिला अशा जाडजुड का बरं होतात? एक्सपर्टसने सांगितले कारण आणि उपाय

लिंबू आणि मध -

जर चेहऱ्यावर चमक नसेल आणि चेहरा निस्तेज वाटत असेल तर तुम्ही पटकन एका भांड्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून हे मिश्रण त्वचेवर चांगले लावा. काही मिनिटे सोडा आणि नंतर स्वच्छ धुवा. चेहऱ्यावर झटपट चमक येईल.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Skin, Skin care