मराठी बातम्या /बातम्या /विदेश /काय सांगता! 'हा' कुत्रा होणार तब्बल 15 कोटींच्या संपत्तीचा मालक; मॉडेलनं संपूर्ण संपत्ती केली नावावर

काय सांगता! 'हा' कुत्रा होणार तब्बल 15 कोटींच्या संपत्तीचा मालक; मॉडेलनं संपूर्ण संपत्ती केली नावावर

 जू हिनं तिची सर्व संपत्ती पाळीव कुत्रा फ्रान्सिस्को याच्या नावावर करण्याची घोषणा केली आहे.

जू हिनं तिची सर्व संपत्ती पाळीव कुत्रा फ्रान्सिस्को याच्या नावावर करण्याची घोषणा केली आहे.

जू हिनं तिची सर्व संपत्ती पाळीव कुत्रा फ्रान्सिस्को याच्या नावावर करण्याची घोषणा केली आहे.

  जगात श्वानप्रेमींचे (Dogs Lover) अनेक प्रकार पाहिले असतील. काही जण आपल्या मुलांप्रमाणे कुत्र्यांचा सांभाळ करतात, तर काही लोक कुत्र्यांवर जिवापाड प्रेम करतात. एका व्यक्तीनं आपली सर्व संपत्ती पाळलेल्या कुत्र्याच्या नावावर केल्याचं तुम्ही एंटरटेन्मेंट (Entertainment) या हिंदी चित्रपटात पाहिलं असेल. परंतु, प्रत्यक्षातदेखील तसंच घडलं आहे. 'माझ्या मृत्यूनंतर 15 कोटींच्या संपत्तीचा मालक माझा पाळलेला कुत्रा असेल,' असं नुकतंच अमेरिकेतल्या (America) एका प्लेबॉय मॉडेलनं (Playboy Model) घोषित केलं आहे. अर्थात त्यामागे काही विशेष कारणं आहेत. ही कारणं सविस्तर जाणून घेऊ या...

  या घोषणेनंतर जू इसेन (Ju Isen) सातत्यानं वकिलांचा सल्ला घेत आहे. जू हिनं तिची सर्व संपत्ती पाळीव कुत्रा फ्रान्सिस्को याच्या नावावर करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय जू हिचं आलिशान घर आणि दोन गाड्याही फ्रान्सिस्कोच्या नावावर होणार आहेत. ब्राझिलियन मॉडेल जू इसेन गेल्या काही काळापासून अमेरिकेत राहत आहे. प्लेबॉय नियतकालिकाच्या टॉप मॉडेल्सपैकी (Top Models) ती एक आहे. या पैशांमुळे फ्रान्सिस्को त्याचं आयुष्य आरामात जगू शकेल.' मला मूल होण्याची शक्यता धूसर होताच मी हा निर्णय घेतला,' असं जू हिनं सांगितलं.

  हे वाचा - VIDEO - मेहुण्यांनी रस्ता अडवून दिला त्रास; वैतागलेला नवरदेव छतावरच चढला आणि...

  मुलाप्रमाणे करते प्रेम

  35 वर्षांची मॉडेल जू तिच्या फ्रान्सिस्को कुत्र्यावर जिवापाड प्रेम करते. ती फ्रान्सिस्कोला मुलाप्रमाणं जीव लावते. इन्स्टाग्रामवरच्या (Instagram) बहुतांश पोस्टमध्ये ती या कुत्र्यासोबत दिसते. जू फ्रान्सिस्कोला तिच्या खासगी जेटमधून (Private Jet) फिरायला नेते आणि त्याला स्टायलिश कपडे घालते. फ्रान्सिस्कोची जीवनशैली एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे आहे. 'तुझी संपत्ती तू फ्रान्सिस्को कुत्र्याच्या नावावर का करू इच्छितेस? तू तर मुलांचं प्लॅनिंग करायला हवं,' असं जू हिला विचारलं असता, 'माझ्याकडे मुलांचं संगोपन करण्यासाठी वेळ नाही,' असं उत्तर तिनं दिलं.

  प्लास्टिक सर्जरीचा आहे छंद

  या घोषणेपूर्वीदेखील जू चर्चेत आली होती. चांगलं दिसण्यासाठी तिनं कोट्यवधीचा खर्च करून प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) केली होती, तेव्हा तिची जोरदार चर्चा झाली होती. आतापर्यंत तिने 50हून अधिक प्लास्टिक सर्जरी केल्या असून, चाकूनं स्वतःच्या चेहऱ्याची चिरफाड करायला आवडत असल्याचं कबूल केलं होतं. या सर्जरीमुळे आपण पूर्णतः वेगळी महिला दिसत असल्याचं जू हिनं सांगितलं. आता अशी परिस्थिती आहे, की ती आरशासमोर उभी राहिली तरी स्वतःला ओळखू शकत नाही. प्लास्टिक सर्जरीव्यतिरिक्त जू हिनं अन्य अवयवांचीही शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

  First published:

  Tags: World news