मराठी बातम्या /बातम्या /Viral /श्रीमंतीला वैतागला तरुण; कोट्यवधींचा मालक झाल्यानंतर म्हणे, 'नोकरीच बरी कारण...'

श्रीमंतीला वैतागला तरुण; कोट्यवधींचा मालक झाल्यानंतर म्हणे, 'नोकरीच बरी कारण...'

एका व्यक्तीने श्रीमंतीचा आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

एका व्यक्तीने श्रीमंतीचा आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

एका व्यक्तीने श्रीमंतीचा आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

लंडन, 30 डिसेंबर : आपल्याकडे भरपूर पैसा असावा, आपण श्रीमंत (Rich man) असावं असं कुणाला वाटत नाही. काही जणांना तर झटपट पैसा हवा असतो. त्यासाठी ते बऱ्याच मार्गांनी पैसा कमावतात. श्रीमंतीमुळे आपल्याला सर्वकाही सुख मिळेल असंच बहुतेकांना वाटतं. पण एक व्यक्ती मात्र श्रीमंतीला अक्षरशः वैतागली आहे. या व्यक्तीने इतका पैसा कमावला की ती आता कोट्यवधींची मालक आहे, पण आता मात्र नोकरीच बरी असं ही व्यक्ती सांगते (Rich man missing job).

पैशाने काहीही खरेदी करता येतं, असं तुम्हाला वाटत असेल तर बक्कळ पैसा असलेली ही श्रीमंत व्यक्ती जे म्हणाली ते समजलं तर तुम्हाला धक्काच बसेल. बिटकॉईनमार्फत कोट्यधीश झालेली ही व्यक्ती श्रीमंत झाल्यानंतरही सुखी नाही. आपण कमावलेल्या पैशांवर खूश नाही. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या  35 वर्षांच्या या व्यक्तीला आपली नोकरी आणि रूटिनची तिला खूप आठवण येते. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार आपली ओळख सांगता या व्यक्तीने श्रीमंतीचा आपला अनुभव रेडिट या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा अनुभव वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

या व्यक्तीने सांगितलं, 2014 साली त्याने बिटकॉईनबाबत माहिती मिळवायला सुरुवात केली. पुढील दीड वर्षे त्याने क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे लावले. आपली संपूर्ण सेव्हिंग त्याने बिटकॉईनमध्ये गुंतवली आणि आपलं नशीब आजमावलं. 2017 साली त्याचं नशीब फळफळलं. त्याला तब्बल 20 कोटी रुपयांचा फायदा झाला. 2019 साली त्याने 62 कोटी रुपयांपेक्षाही जास्त पैसे कमावले. त्यानंतर त्याचं आयुष्यच बदललं.

हे वाचा - रक्तबंबाळ झाले, हाडं तुटली तरी कपल म्हणे, 'बरं झालं आमचा अपघात झाला'

आता इतका पैसा असेल तर कोन कशाला नोकरीत मेहनत कशाला करत राहिल. कुणीही नोकरी सोडेलच. या व्यक्तीनेही आपली नोकरी सोडली. पण आता त्याला आपलं आयुष्य बोरिंग वाटतं आहे. ऑफिसच्या कामाची त्याला आठवण येत आहे.

व्यक्ती म्हणाली, पैशांनी तो खूप काही खरेदी करू शकतो. पण त्याला ते जुने दिवस हवेत जे तो इच्छा असूनही खरेदी करू शकत नाही किंवा जगू शकत नाही. हे पैसे चीटिंग करून मिळाले आहेत मेहनतीने नाहीत. आता मला वाटतं मी माझ्या आयुष्याच चीट कोड वापरला. माझ्या नोकरीवर माझं खूप प्रेम होतं. नोकरीमुळे आयुष्यात एक उत्साह होता. फक्त करोडपती बनल्यामुळे हा अनुभव पुन्हा जगणं अशक्य आहे. आता आपलं आयुष्य मजेशीर कसं बनवणार हे मला माहिती नाही.

हे वाचा - IT Raid : तळघरातून, भिंतीतून आणि कपाटांमधून निघतायंत कॅश आणि सोनं! पाहा PHOTOS

रिपोर्टनुसार ही व्यक्ती आधी कन्टेन्ट क्रिएटर होती. त्याचा महिन्याचा पगार 25 लाख रुपये होता. आपला पगार महागड्या वस्तूंवर खर्च न करता त्याने बिटकॉईनमध्ये गुंतवले.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Money, Viral, World news