व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांशेजारी बसले आहे. त्यांच्यामध्ये लग्नाच्या विधी होत असतात. इतक्यात नवरीसमोर एक व्यक्ती येते आणि ती नवरीसोबत काहीतरी बोलते. त्या व्यक्तीसोबत बोलता बोलता नवरीच्या रागाचा पारा चढतो. ती त्या व्यक्तीला ढकलते, त्याला मारहाण करते. कदाचित नवरीसमोर कोणत्या तरी गोष्टीचा उलगडा झालेला असावा, ज्यामुळे ती लग्नातच इतकी चिढली आहे. हे वाचा - दिराने केला नको तो हट्ट, वहिनीने मग लाटण्यानेच चोपलं; VIDEO VIRAL या भांडणात नवरदेवही काहीतरी बोलतो तेव्हा नवरी त्याच्याकडेही रागाने पाहते, त्याच्यावर ओरडते आणि त्यालाही चोपून काढते. लग्नात नवरीचा हा रूद्र अवतार पाहून नवरदेवाला धक्काच बसतो. तो घाबरतो आणि आपल्या जागेवरून उटून तो मंडप सोडून तिथून पळ काढतो. नवरी त्याला मनवण्यासाठीही उठत नाही. हे वाचा - VIDEO - चिमुकला 'सुपरहिरो' जोमात, आईवडील कोमात! काय केला प्रताप तुम्हीच पाहा लग्नात जशी मजामस्ती असते तसे काही वादही असतात. असे बरेच क्षण असतात जे कायम लक्षात राहतात. लग्नातील हा क्षण फक्त नवरा-नवरी आणि त्यांच्या लग्नात उपस्थित असलेले लोकच नाहीत तर आपणही कधीच विसरणार नाही.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video