Home /News /viral /

भूत की आणखी काही? चिमुरडीचा हा VIDEO पाहून तुम्हाला दरदरून फुटेल घाम

भूत की आणखी काही? चिमुरडीचा हा VIDEO पाहून तुम्हाला दरदरून फुटेल घाम

मुलीसोबत जे काही घडलं ते पाहून तिच्या वडिलांनाही मोठा धक्का बसला.

    मुंबई, 24 फेब्रुवारी : तुम्ही आजवर बऱ्याच हॉरर फिल्म्स (Horror films) पाहिल्या असतील, हॉरर व्हिडीओ (Horror video) पाहिले असतील. पडद्यावर जे काही दाखवलं जातं ते काही खरं नसतं हे माहिती असूनही ते सर्व पाहताना दरदरून घाम फुटतो, अंग थरथर कापू लागतं आणि बोलतीही बंद होते. पण असं काही प्रत्यक्षात घडत असल्याचं म्हटलं तर. असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral video) होतो आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही थरथर कापाल. टिकटॉक युझर @josedean0222 ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो त्याच्या चिमुरडीचा व्हिडीओ आहे. आपल्या मुलीच्या खोलीत त्याने सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे आणि त्याच कॅमेऱ्यातील फुटेज तो पाहत होता. त्यावेळी त्याला जे दिसलं ते पाहून मोठा धक्काच बसला. किंबहुना तो घाबरलाच. असं या व्हिडीओत नेमकं होतं तरी काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्यासाठी हा व्हिडीओ पाहा. व्हिडीओत पाहू शकता. मुलगी आपल्या रूममध्ये एकटीच खेळते आहे. सुरुवातीला ती बेडवर पोटावर झोपली आहे आणि बेडच्या खाली वाकून पाहते आहेत. त्यानंतर ती बेडवरून खाली उतरते आणि बेडच्या खाली वाकते. बेडखाली जाण्याचा प्रयत्न ती करते. हे वाचा - बायकोच्या कटकटीपासून वाचण्याची ट्रिक; हर्ष गोयंका यांनी शेअर केला VIDEO पण सामान्यपणे मूल जेव्हा बेडखाली जातं तेव्हा ते हळूहळू घसटत जाण्याचं प्रयत्न करतं. पण ही मुलगी अचानक सरकत आत जाते जसं कुणी तिला खेचत असावं. सुरुवातीला ती जेव्हा स्वतःहून बेडखाली जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती ओरडत नाही पण जेव्हा ती अशा विचित्र पद्धतीने बेडखाली जाताना दिसते तेव्हा ती ओरडते. व्हिडीओत तिचा आवाजही ऐकायला मिळतो. जसं कुणी तिला मुद्दाम बेडखाली ओढतं आहे. हे वाचा - चालायचा कंटाळा म्हणून शॉर्टकट घेतला आणि भररस्त्यात झाली फजिती; पाहा VIDEO द मिररनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या  व्यक्तीनं आपल्या पत्नीदेखील हा व्हिडीओ दाखवला आणि तिला सांगितलं. पण त्याच्या पत्नीनं ती आपोआपच बेडखाली गेली असावी असं म्हटलं. पण तरी या व्यक्तीला यावर विश्वास नाही. मिररच्या रिपोर्टनुसार मुलीच्या वडिलांना हे एखाद्या अदृश्य शक्तीचं काम असावं, असं वाटतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking video viral, Tiktok viral video, Viral

    पुढील बातम्या