मुंबई, 23 फेब्रुवारी : बायकोची बोलणं म्हणजे प्रत्येक नवऱ्याला कटकटच वाटते. त्यामुळे कित्येक नवरे आपल्या बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करतात. बायकोची बडबड नको आणि शांतता मिळावी यासाठी नवरे काही ना काही मार्ग शोधतच असतात. त्यापैकी एक म्हणजे बायकोला माहेरी पाठवणं. पण प्रत्येकवेळी हे शक्य होत नाही. मग बायको घरात असताना तिच्या बडबडीपासून आपण नेमकी सुटका कशी मिळवावी, यावर तुम्हीदेखील उपाय शोधत असाल तर हा व्हिडीओ जरूर पाहा. सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये बायकोच्या बडबडीपासून दूर राहण्याची ट्रिक दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे बिझनसमन हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि तेदेखील याचा सराव करत आहेत.
I have been practicing this... for my post dinner chats with my wife ! pic.twitter.com/qeYaot2tED
— Harsh Goenka (@hvgoenka) February 21, 2021
व्हिडीओत पाहू शकता की ही व्यक्ती विचित्र पद्धतीनं आपले कान बंद करते. हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की, जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती. जेव्हा या व्यक्तीचं त्याच्या पत्नीसोबत भांडण होत असेल तेव्हा तो अशाच पद्धतीनं आपले कान बंद करू शकतो. हा व्हिडीओ शेअर करताना हर्ष गोएंका यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, जेवल्यानंतर बायकोसोबत बोलताना असं करण्यासाठी मी याचा सराव करतो आहे. हे वाचा - Shocking! ऑनलाईन ऑर्डर केलं Cold drink आणि बाटलीत मिळाली लघवी सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांच्या चांगल्याचा पसंतीस उतरला आहे. व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. शिवाय हर्ष गोएंका यांच्या कॅप्शनवरही प्रतिक्रिया येत आहेत. एका युझरनं तुम्हाला उपाशी झोपावं लागेल, असं म्हटलं आहे. तर एकानं तुमची बायको वाटतं ट्वीटर वापरत नाही, असं म्हटलं आहे.