Home /News /viral /

चालायचा कंटाळा म्हणून शॉर्टकट घेतला आणि भररस्त्यात झाली फजिती; पाहा VIDEO

चालायचा कंटाळा म्हणून शॉर्टकट घेतला आणि भररस्त्यात झाली फजिती; पाहा VIDEO

एका युवकाने रस्ता ओलांडण्यासाठी शॉर्टकट घेवून दुभाजकावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा प्रयत्न अंगलट येऊन चांगलीच फजिती झाली आहे.

    सोशल मीडिया, 22 फेब्रुवारी: आयुष्यात कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी किमान एक तरी शॉर्टकट असतोच असतो. पण असा शॉर्टकट घेतल्याने आपली बऱ्याचदा फजितीही होऊ शकते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका युवकाने रस्ता ओलांडण्यासाठी शॉर्टकट घेतला आहे. रस्ता ओलांडण्यासाठी त्याने दुभाजकावरून जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा प्रयत्न अंगलट येऊन त्याची फजिती झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. चीनमधील जुहाई येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला दुभाजकांवरून उडी मारून चांगलंच महागात पडलं आहे. दुभाजकांवरून उडी मारून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना, तो रेलिंगसह खाली पडला आहे. त्याचा हा व्हिडिओ पिपल्स डेलीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक व्यक्ती रस्त्यावर वाहनं असताना दुभाजकावर चढून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. तो दुभाजकावर चढल्यानंतर त्याचं संतुलन बिघडलं आहे. यानंतर तो ज्या बाजूने दुभाजकावर चढला होता. त्याच बाजूला खाली रस्त्यावर पडला आहे. यावेळी तो केवळ एकटात खाली पडला नाही तर संपूर्ण दुभाजकही त्यांच्या अंगावर पडलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: China, Viral video.

    पुढील बातम्या