मराठी बातम्या /बातम्या /Viral /अनोखी मैत्री, ट्रेनमध्ये थकलेले दोन प्रवासी करताएत विश्रांती VIDEO

अनोखी मैत्री, ट्रेनमध्ये थकलेले दोन प्रवासी करताएत विश्रांती VIDEO

अनोख्या मैत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अनोख्या मैत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अनोख्या मैत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 जानेवारी : अनेक माणसाच्या मैत्रीचे खूप दाखले दिले जातात. तसेच मैत्री दिनाला वेगवेगळे लेख छापून येतात. अनेक जण आपापल्या पद्धतीने मैत्री दिवस साजरा करतात. एकंदरीतच प्रत्येक जण आपापल्या परीने मैत्री जपण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातच आता रेल्वेच्या प्रवासात एक अनोखी मैत्री पाहायला मिळाली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती रेल्वेने प्रवास करत आहे. तसेच तो थकलेला दिसत आहे. त्याच्या जवळ असलेल्या बॅकेत कुत्र्याचे पिल्लू दिसत आहे. याप्रकारे व्हिडिओमध्ये दोन्ही जण विश्रांती करताना दिसत आहेत. यानंतर मैत्रीसाठी मुकी जनावरं कधीही बरी, अशा प्रतिक्रिया अनेक जण देत आहे. अनोख्या मैत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

एकीकडे काही ठिकाणी मैत्रीवरुन होणारी भांडणे, तसेच त्यातून होणारी गुन्हेगारीच्या घटना घडत असताना, अशा मैत्रीचा हा व्हायरल व्हिडिओ खूप काही सांगून जातो.

First published:

Tags: Live video viral, Video viral, Viral video.