मुंबई : सोशल मीडिया हे मनोरंजनाचं प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे इथे तुम्हाला बहुतांश व्हिडीओ असे पाहायला मिळतात. जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. बऱ्याचदा लोक फेमस होण्यासाठी असे काही व्हिडीओ बनवतात, जे कधीकधी त्यांच्या जीवावर बेततात. तर बऱ्याचदा लोक गंभीर जखमी होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याला लाखो वेळा पाहिलं गेलं आहे.
हा व्हिडीओ एका स्टंटचा व्हिडीओ आहे. जो एक महिला करत आहे.
Video : जिराफच्या पिल्लावर सिंहीणीचा हल्ला, आईची एन्ट्री होताच खेळच पलटला
ज्यामध्ये एक महिला झाडाच्या फांदीला लटकून व्यायाम करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तेव्हाच झाडाची फांदी तुटली आणि महिला धपकन खाली पडली. ही महिला अशा प्रकारे खाली पडली की ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
या महिलेचे कपडे पाहून तुम्हाला हे जाणवेल की महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली आहे. ती आधी खूप व्यायाम करते. मग ती तिच्या समोरच्या झाडाजवळ जाते. पुढे ती झाडाच्या फांदीला लटकून व्यायाम करू लागते. तेव्हा मुलगी जोरात खाली पडते.
— People Instantly Repenting (@peoplerepentlng) March 22, 2023
@peoplerepentlng नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. इतकेच नाही तर व्हिडिओला हजारो लाईक्स आणि रिट्विट्सही मिळाले आहेत. यावर नेटिझन्सही आपल्या प्रतिक्रिया देण्यात व्यस्त आहेत.
आता हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होऊ लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Comedy, Shocking, Social media, Top trending, Viral