नवी दिल्ली 14 जुलै : आजकाल लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि पोस्टला लाईक्स मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. अनेकदा ते विचित्र व्हिडिओ बनवतात आणि इंटरनेटवर पोस्ट करतात. पण या नादात बऱ्याचदा ते स्वतःचंही नुकसान करून घेतात. याआधी तुम्ही सेल्फीमुळे झालेल्या अनेक अपघातांबद्दल ऐकलं असेल. ज्यात फोटो काढण्याच्या नादात लोक इतके व्यस्त होतात की स्वतःचाच जीव धोक्यात टाकतात. सध्या अशाच एक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात सेल्फी घेण्यात मग्न असलेल्या या तरुणीसोबत इतकी भयानक दुर्घटना घडली की ती पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. @momentoviral नावाच्या ट्विटर अकाउंटवर अनेकदा धक्कादायक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक मुलगी बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. मात्र पुढच्याच क्षणी ती अपघाताची बळी ठरते. बरेच लोक फक्त कूल दिसण्यासाठी बाइक किंवा कारवर बसून रील बनवतात. ही मुलगी देखील असंच करताना दिसत आहे.
Para reflexionarpic.twitter.com/DC1YdEk4Cr
— Momentos Virales (@momentoviral) July 13, 2023
व्हिडिओमध्ये एक बाईक रॅली निघताना दिसत आहे. त्यासाठी अनेक लोक प्रेक्षक म्हणून उभे आहेत तर अनेक दुचाकीस्वार या लोकांच्या मधोमध असलेल्या आपली वाहनं चालवताना दिसत आहेत. त्यापैकी एक दुचाकीस्वार व्हीली करताना दिसत आहे. म्हणजे त्याच्या बाईकचा पुढचा टायर हवेत आहे. बाईकच्या पुढच्या भागात एक तरुणी बसली आहे आणि ती सेल्फी किंवा रील काढत आहे. अचानक दुसऱ्या बाजूने एक वेगवान दुचाकी येते, जी थेट त्याच दुचाकीला धडकते ज्यावर ही तरुणी बसली आहे. दुचाकीच्या धडकेमुळे मुलगी दुचाकीवरुन पडून जोरात जमिनीवर कोसळली. ‘पापा की परी’ विसरा, आता ‘पापा का परा’ आला ट्रेंडमध्ये; सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहिलात का? त्यानंतरच्या दृश्यात तरुणीला दुखापत झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. यात दिसतं की पडल्यामुळे तिचे हातपाय थरथरत आहेत. नंतर काही माहिती वेगळ्या भाषेत लिहून येत आहे पण ते पाहता या घटनेत तरुणीचा मृत्यू झाल्यासारखं वाटतं. या व्हिडिओला 7 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं की, महिलेच्या डोक्याला खोलवर जखम झाली असावी, त्यामुळे तिचे हातपाय थरथरू लागले. दुसऱ्याने म्हटलं की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. आणखी एकाने म्हटलं की, मुलीचा मृत्यू झाला नाही, परंतु तिने या घटनेनंतर एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये तिने तिच्यासोबत काय घडलं ते सांगितलं आहे.