मुंबई, 13 जुलै : सोशल मीडिया म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते मजेदार व्हिडीओ. हे व्हिडीओ पाहण्यात आपला तासनतास वेळ कसा निघून जातो हे आपलं आपल्यालाच कळत नाही. इथे पापा की परी संदर्भात देखील तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, जे तरुणींशी संबंधीत असतात आणि जवळ-जवळ सर्वज तरुण मुलं पापा की परी वेड्यासारख्या चुका करतात असं मानतात आणि त्यासंदर्भात व्हिडीओ शेअर करत असतात. पण सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे, जो हे दाखवून देत नाही की फक्त ‘पापा की परी’च नाही तर ‘पापा के परे’ देखील असतात जे कधी कधी वेड्यासारखं वागतात ज्यामुळे कधी त्यांचं तर कधी दुसऱ्याचं नुकसान करतात. या व्हिडीओतील तरुणाने देखील असंच केलं. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच पोट धरुन हसायला भाग पाडेल. ‘कितने मगरमच्छ थें?’ एक कोंबडा आणि डजनभर मगरी, ‘ये तो ना इन्साफी है’… मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच या मजेदार व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. यामध्येच काही युजर्सने या तरुणाच्या कृत्याला पाहून पापा का परा अशी मजेदार उपमा दिली आहे. हा व्हिडीओ केवळ 10 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये काही बाईकवाले इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर लाईनमध्ये उभे आहेत आणि आपल्या वेळेची वाट पाहात आहेत. Viral Video : कारला धडक आणि महिला रस्त्यावरुन गायब, अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत यावेळेला एक दुचाकीस्वार पुढे सरकताच त्याच्या मागची व्यक्ती मध्येच येते. अशा स्थितीत दुसऱ्या दुचाकीस्वाराचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटते आणि तो आपली गाडी घेऊन असा काही पुढे येतो की त्याच्या गाडीचं पुढचं चाक सरळ हवेत उडतं. खरंतर या चालकाने गाडीचा क्लच सोडल्यामुळे असं घडलं, दुचाकी पुढचे येताच मागच्या सीटवर बसलेली वृद्ध व्यक्ती जमिनीवर पडते. नशिबाने हे सगळं एवढ्यावरच निभावलं, नाहीतर पेर्ट्रोल पंपाजवळ केवढा मोठा अपघात घडला असता, हे काही वेगळं सांगायला नको. हा व्हिडीओ तसा गंभीर आहे, पण असं असलं तरी देखील लोकांचा असा मुर्खपणा अनेकवेळा हसण्यावारी घेतला जातो.
लोग पापा की परियों को बदनाम करते हैं लड़के भी किसी से कम नहीं हैं 😂😇👇 pic.twitter.com/8Kgk7XDnRD
— Pratima Chauhan (@Pratimach_98) December 2, 2022
ही मजेशीर क्लिप Pratima Chauhan @Pratimach_98 या ट्विटर युजरने शेअर केली आणि मजेशीर पणे लिहिले की, लोक पापांच्या परींची बदनामी करतात, मुलेही कोणापेक्षा कमी नाहीत. या व्हिडीओला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर देखील अपलोड केले गेले आहे. ज्यावर असंख्य लाईक्स आणि कमेंट्स आहेत.