Home /News /viral /

मस्ती करणं तरुणीला भोवलं; चवताळलेल्या सापाने अचानक केला हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO

मस्ती करणं तरुणीला भोवलं; चवताळलेल्या सापाने अचानक केला हल्ला, थरकाप उडवणारा VIDEO

आपण पाहू शकता की तरुणीने तिच्या हातात एक घातक साप धरला आहे. यादरम्यान ती सापाशी खेळण्याचा प्रयत्न करते. ती तरुणी त्या धोकादायक सापाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं तुम्ही पाहू शकता.

  नवी दिल्ली 16 मे : सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. समोर साप पाहून अनेकांची अवस्था वाईट होते आणि घाम फुटतो. साप समोर पाहणे खूप भयावह असतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सापांचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. पाहियातील काही व्हिडिओ अतिशय भीतीदायक असतात, तर काही व्हिडिओ (Girl Playing With Snake) काळजाचा ठोका चुकवणारे असतात. महिलेनं धावत्या ट्रेनमधून आधी मुलांना फेकलं, मग स्वतःही घेतली उडी अन्..., VIDEO पाहून उडेल थरकाप आजकाल एक व्हिडिओ (Snake Shocking Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका मुलीचा आहे, जिच्या हातामध्ये एक घातक साप दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी हातात साप घेऊन त्याच्यासोबत मस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान, साप त्या मुलीसोबत काय करतो हे पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. साप अचानक या तरुणीसोबत जे काही करतो, ते ती आयुष्यभर विसरणार नाही.
  आपण पाहू शकता की तरुणीने तिच्या हातात एक घातक साप धरला आहे. यादरम्यान ती सापाशी खेळण्याचा प्रयत्न करते. ती तरुणी त्या धोकादायक सापाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं तुम्ही पाहू शकता. दरम्यान, साप त्या तरुणीवर चिडतो. यानंतर त्याने तरुणीच्या उजव्या मनगटाचा चावा घेतला. झाडाच्या फांदीवर चढण्यासाठी डझनभर किंग कोब्रा आपसात भिडले, अंगावर काटा आणणारा VIDEO साप अनेक वेळा मुलीचा हात पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं तुम्ही पाहू शकता. यामुळे तरुणी घाबरते. व्हिडिओमध्ये ती या धोकादायक सापापासून स्वत:चा बचाव करताना दिसत आहे. एकदा तर या सापाने तिची बोटंच आपल्या तोंडात पकडल्याचं दिसतं. snake._.world नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका भयावह आहे की इंटरनेटवर तो चर्चेचा विषय बनला आहे. अवघ्या काही तासांत हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Snake video

  पुढील बातम्या