पुणे, वैभव सोनावणे : महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ म्हणून बैलगाडा शर्यतीला ओळख मिळाली आहे. राज्याच्या अनेक भागात ही शर्यत खेळवली जाते. ज्यामध्ये गावातील असे पुरुष सहभाग घेतात, जे धाडस करुन बैलगाडी पळवू शकतात. तसे पाहाता हा पुरुषांचा खेळ आहे आणि यामध्ये जीवाचा धोका देखील खूप जास्त आहे. अनेक लोकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर अनेक लोक गंभीर जखमी देखील झाले आहेत. बैलगाडा शर्यतीमुळे बैलांचा छळ होतो असे सांगत न्यायालयातून बैलगाडा शर्तीवर बंदी आणली गेली, पण असं असलं तरी राज्याच्या अनेक भागात ही शर्यत खेळली जाते. पण पुरुषांची मक्तेदारी असलेल्या खेळात एका महिलेनं पाऊल ठेवलं आहे, ज्याबद्दल ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. स्टंटबाजी करणं तरुणीला पडलं महागात, झाडाच्या फांदीला लटकली आणि… पाहा Video ही मुलगी फक्त 14 वर्षाची आहे आणि इतक्या कमी वयात तिने जे धाडस दाखवलं आहे, त्यामुळे तिचं कौतुक होत आहे. या मुलीचं नाव शर्मिला दीपक शिळीमकर आणि शर्मीला हुजूरपागा, पुणे शाळेत नववीत शिकते. बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये फक्त पुरुषच घोडे चालवण्याचे डेरिंग करतात या स्पर्धेमध्ये धोके खूप असतात. हे धोके पत्करण्याचे साहस अनेक पुरुष सुद्धा करू शकत नाहीत परंतु, या क्षेत्रात नव्याने साहस करणारी शर्मिला पहिलीच मुलगी आहे. तिला योग्य मार्गदर्शन ट्रेनिंग त्या पद्धतीने देण्यात आले आहे की केंदुरच्या घाटामध्ये तिने रेकॉर्ड केला आहे. दहा सेकंदा च्या आत तिने घोडी पाळवली आहे.
पुण्याच्या शर्मिलाचं जगावेगळं शौर्य, वय 14, बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये फक्त पुरुषच घोडे चालवण्याचे डेरिंग करतात, परंतू येथे नव्याने साहस करणारी पहिलीच मुलगी आहे.#Pune #News18Lokmat pic.twitter.com/L6SlaM5VNb
— News18Lokmat (@News18lokmat) March 31, 2023
विशेष म्हणजे तिची फायनल एक्झाम असून सुद्धा ती या क्षेत्रामध्ये खेडोपाडी जाऊन लोकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे.