जाहिरात
मराठी बातम्या / Viral / डोंगराच्या कड्यावर उभी होती तरुणी, तोल गेला आणि... थरारक Video Viral

डोंगराच्या कड्यावर उभी होती तरुणी, तोल गेला आणि... थरारक Video Viral

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. इथे दररोज असे काही व्हिडीओ फोटो व्हायरल होतात. जे पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. तर काही व्हिडीओ हे फारच मनोरंजक असतात. म्हणून तर त्यांना पाहण्यात माणसाचा वेळ कसा निघून जातो, हे त्याचं त्यालाच कळत नाही. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका तरुणीचा आहे. ज्यामध्ये या तरुणीचा पाय घसरतो आणि ती डोंगराच्या कड्यावरुन समुद्रात जाऊन पडते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. इथे दररोज असे काही व्हिडीओ फोटो व्हायरल होतात. जे पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. तर काही व्हिडीओ हे फारच मनोरंजक असतात. म्हणून तर त्यांना पाहण्यात माणसाचा वेळ कसा निघून जातो, हे त्याचं त्यालाच कळत नाही. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका तरुणीचा आहे. ज्यामध्ये या तरुणीचा पाय घसरतो आणि ती डोंगराच्या कड्यावरुन समुद्रात जाऊन पडते. दारुच्या नशेत व्यक्तीचा धोकादायक स्टंट, झाडावर चढला आणि… Video Viral हा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्याला लोकांनी लाखोवेळा पाहिलं आहे. या तरुणीसोबत फारच भयंकर अपघात घडला. ही तरुणी खरंतर समुद्राजवळ असलेल्या लहान डोंगरावर उभी होती, तेव्हात तिचा पाय घसरला, तरुणीने खूर सावरण्याचा प्रयत्न केला पण ती खाली सरकत गेली आणि थेट पाण्यात पडली.

News18लोकमत
News18लोकमत

समुद्राकाठी मजा घेण्यासाठी आलेल्या या तरुणीचा आनंद एका क्षणात दु:खात बदलला. तिच्या सोबत असं घडेल याची तिला अजिबात कल्पना नव्हती. तिचा हाच निष्काळजीपणा तिला नडला, ज्यामुळे हा प्रकार घडला. हा व्हिडीओ खरंतर सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आला आहे. कारण आपण बऱ्याचदा आनंदाच्या भरात असं पाऊल उचलून बसतो की ज्यामुळे अखेर आपल्यावर पश्चातापाची वेळ येते. तसेच बऱ्याचदा सहलीच्या ठिकाणी असे अपघात होताना तुम्ही पाहिलेच असेल. म्हणून कधीही सावधगिरी बाळगणे केव्हा ही चांगले.

जाहिरात

हा थक्क करणारा व्हिडिओ renanlife नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. यावर नेटिझन्सकडूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. पण या तरुणीचं काय झालं हे काही कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ परदेशातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात