Home /News /videsh /

लग्नात वाजलेल्या गाण्यामुळे चढला नवरदेवाचा पारा; रागात नवरीबाईला मंडपातच घटस्फोट दिला

लग्नात वाजलेल्या गाण्यामुळे चढला नवरदेवाचा पारा; रागात नवरीबाईला मंडपातच घटस्फोट दिला

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

ज्या मांडवात बांधली लग्नगाठ तिथंच सोडली साथ.

    बगदाद, 11 जानेवारी :  लग्न (Wedding news) म्हटलं की नाचगाणं आलंच. सध्या तर लग्नात सरप्राईझ डान्स (Wedding dance) केले जातात. कधी नवरा-नवरीचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक त्यांच्यासाठी डान्स करतात. तर कधी नवरा-नवरी एकमेकांसाठी किंवा एकमेकांसोबत डान्स करतात. पण लग्नातील असंच नाचगाणं लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे (Divorce on wedding). लग्नात असं गाणं लागलं, ज्यामुळे नवरदेवाने रागात नवरीबाईला लग्नमंडपातच घटस्फोट दिला आहे (Groom divorce bride on wedding). इराकच्या  (Iraq) बगदादमधील (Baghdad) हे धक्कादायक प्रकरण आहे. एरवी लग्न झाल्यानंतर काही वर्षे सर्वकाही सुरळीत सुरू असतं. त्यानंतर कपलमध्ये हळूहळू खटके उडायला लागतात, भांडणं होऊ लागतात आणि काही वेळा हा वाद अगदी घटस्फोटापर्यंतही पोहोचतो. पण या प्रकरणात मात्र लग्नाच्या दिवशीच घटस्फोट झाला आहे (Groom divorce bride on wedding due to song). नवरीबाईने लग्नमंडपात असं काही केलं ज्यामुळे नवरदेवाचा पारा चढला (Bride Groom). नवरीबाईने अशा गाण्यावर डान्स केला ज्यामुळे नवरदेव आणि त्याच्या कुटुंबाच्या भावना दुखावल्या आणइ त्याने घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय घेतला. आता इतकं या गाण्यात असं काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. हे वाचा - संशयी गर्लफ्रेंडची दहशत! रागात असं काही केलं की भीतीने BF शहर सोडूनच पळाला या लग्नात जे गाणं वाजवण्यात आलं ते सीरियाई गाणं होतं.  मेसायतारा (Mesaytara) हे गाणं. या गाण्यात असे काही बोल होते, जे नवरदेव आणि त्याच्या कुटुंबाला बिलकुल आवडले नाहीत. त्यातही महत्त्वाचं म्हणजे या गाण्यावर नवरीबाईने डान्सही केला. मेसायतारा (Mesaytara) या शब्दाचा अर्थ आय एम डोमिनेन्ट किंवा आय विल कंट्रोल यू असा आहे. शिवाय या गाण्यात मी प्रभावशाली आहे. तुम्ही माझ्या कठोर निर्देशांचं पालन कराल. जोपर्यंत तो माझ्यासोबत राहणार तोपर्यंत तू माझ्या आज्ञेत राहणार. मी अभिमानी आहे, मी अभिमानी आहे, असे बोल आहेत. गाण्याचे हे बोल ऐकून नवरदेवाचा चेहरा लालबुंद झाला. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने यावरून नवरीसोबत वाद घातला आणि तिला घटस्फोट दिला. हे वाचा - Video : सुंदर तरुणीला पाहून KISS करायला जात होता तरुण, सत्य कळताच गेला पळून झी न्यूजच्या रिपोर्टनुसार गाण्यामुळे नवविवाहिताचा घटस्फोट होण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. गेल्या वर्षी जॉर्डनमध्ये आणि काही वर्षांपूर्वी लेबनानमध्येही गाण्यावरून लग्नातच घटस्फोट झाला होता.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bridegroom, Divorce, Relationship, Viral, Wedding, World news

    पुढील बातम्या