नवी दिल्ली 08 जुलै : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. अनेकदा तर ते आपला जीवही धोक्यात घालतात. व्हिडिओ बनवण्याच्या आणि फोटो काढण्याच्या नादात ते आपला जीव धोक्यात घालायलाही तयार असतात. इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल प्लॅटफॉर्मवर तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील, ज्यांना धोकादायक स्टंट करायला आवडतं. यात आपला जीवही जाऊ शकतो, याचा ते विचारही करत नाहीत. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी पोज देताना एका मुलीने आपला जीव कसा धोक्यात घातला हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुणी प्रियकराचा हात पकडून रेलिंगला लटकली. मुलीला वाटलं की खाली जाळी आहे त्यामुळे ती पडली तरी वाचेल. मुलगी लटकून फोटोसाठी पोज देत असतानाच प्रियकराने तिचा हात सोडला. हात सोडताच तरुणी 10-15 फूट खाली जात जाळीसह धाडकन कोसळली.
She tried to get a cool Instagram post 😬 pic.twitter.com/3rX4Zxbwug
— More Crazy Clips (@MoreCrazyClips) April 12, 2023
प्रियकरालाही असंच वाटलं होतं, की प्रेयसी जाऊन जाळीवर पडेल. मात्र ही जाळी व्यवस्थित फिट केली गेली नव्हती. याच कारणामुळे मुलीच्या वजनाने जाळी खाली गेली. तरुणी धोकादायक पद्धतीने खाली पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता या तरुणीचं पुढे काय झालं याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र, ती ज्या पद्धतीने पडली ते पाहता तिला किरकोळ दुखापत झाली असावी, असा अंदाज बांधता येतो. Viral Video: रस्त्यावरच धावत्या रिक्षाचा टायर बदलला; चालकाचा ‘पराक्रम’ बघून थक्क व्हाल हा व्हिडिओ @MoreCrazyClips नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, तरुणी इंस्टाग्रामसाठी मस्त फोटो काढण्याचा प्रयत्न करत होती. व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांनी या क्लिपवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की, ‘लोक कधीच धडा घेणार नाहीत.’ तर दुसरा म्हणाला, ‘ती जिवंत वाचली का?’. आणखी एका यूजरने म्हटलं की, ‘इन्स्टाग्राम तरुणांचा जीव घेत आहे.’