मुंबई, 03 ऑगस्ट : साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला घाम फुटतो. असा साप आपल्या नकळत आपल्या अंगावर आला तर काय होईल. कल्पनाही नकोशी वाटते ना... पण असाच एक साप एका चिमुकलीच्या अंगावर चढला. व्हिडीओ पाहूनच तुमच्या काळजाचं पाणी पाणी होईल. अंगावर काटा आणणारा असा हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
एक मुलगी जमिनीवर झोपलेली असताना अचानक तिथं एक साप आला आणि तो तिच्या शरीरावर चढला. त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. व्हिडीओ पाहूनही तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडीओत पाहू शकता एक मुलगी फरशीवर झोपलेली आहे. तेव्हा तिच्या अंगावर एक साप चढतो. पायावरून साप तिच्या पोटावरून चेहऱ्यापर्यंत जातो. त्यानंतर तिच्या शरीरावर तो असाच रेंगताना दिसतो.
हे वाचा - मगरीने पिल्लाला जबड्यात धरलं, वाचवण्यासाठी आईने पायाखाली तुडवून मारलं; पाहा VIDEO
व्हिडीओ पाहूनच आपल्याला धडकी भरते पण मुलगी मात्र बिनधास्त आहे. ती बिलकुल घाबरत नाही. तिच्या चेहऱ्यावर किंचितशीही भीती दिसत नाही. उलट ती हसते आणि हाताने व्हिक्ट्री साइन करून दाखवते.
आश्चर्य म्हणजे सापही त्या मुलीला काही करत नाही. साप आणि मुलगी एकमेकांना ओळखतात त्या दोघांची जणू घट्ट मैत्रीच आहे.
हे वाचा - VIDEO - शिंगांवरून हवेत उडवत जमिनीवर आपटत होता रेडा; निर्जीव कारने वाचवला मुलाचा जीव
snakemasterexotics इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.