Home /News /viral /

VIDEO : लहान भावानं केली गंमत, छतावरून जमीनीवर पडली तरुणी

VIDEO : लहान भावानं केली गंमत, छतावरून जमीनीवर पडली तरुणी

भाऊ गंमत म्हणून बहिणीला डिवचायला गेला आणि तरुणी छतावरून थेट खाली उभा असलेल्या दुचाकीवर आदळून जमीनीवर पडली.

    छिंदवाडा, 04 मे : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. देशात कोरोना व्हायरसमुळे 3 मेपर्यंत कऱण्यात आलेला लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे  सध्या सर्वच लोक घरात अडकले आहेत. याकाळात लोक घरात बसून कंटाळले असून काही विरंगुळा म्हणून घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत बसतात थोडे फिरतात. आता एक तरुणी मैत्रिणीसोबत बसली असताना तिच्या लहान भावाने केलेली गंमत जीवावर आली होती. मैत्रीणीसोबत छतावर बसलेली असताना युवतीतीसोबत चिमुकल्यानं असं काही केलं ज्यामुळे दुर्घटना घडली. सुदैवानं यामध्ये युवती गंभीर जखमी झाली नाही पण हा व्हिडीओ पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. व्हिडीओमध्ये दिसतं की, लहान भावानं बहिणीला कसा डिवचत आहे. ती मैत्रीणीसोबत छतावर गप्पा मारत असताना भाऊ तिथं आला. त्यानं तिच्या पायाला गुदगुल्या केल्या. त्यावेळी मुलीचा तोल गेला आणि ती खाली पडली. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथल्या छोट्या बाजारपेठेतील असल्याची माहिती मिळत आहे. हे वाचा : Lockdown मध्ये बाईकवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन, VIDEO VIRAL छतावरून दुचाकीवर आपटली आणि तरुणी खाली कोसळली. यात तिला जराही खरचटलं नाही. दैव बलवत्तर म्हणून जास्त काही झालं नाही. मात्र लॉकडाऊनच्या या काळात तिला काही गंभीर दुखापत झाली असती तर ते जीवावर बेतलं असतं. तरुणी सुखरूप असल्याचं समजताच कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. हे वाचा : सोशल डिस्टन्स ठेवत पार पडलेल्या लग्नाचा VIDEO व्हायरल,काठी वापरून घातली 'वरमाला'
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या