वेडेपणाचा कहर! चहासोबत तरुणीनं खाल्लं चिकन, VIDEO VIRAL

वेडेपणाचा कहर! चहासोबत तरुणीनं खाल्लं चिकन, VIDEO VIRAL

चहा प्रेमींच्या डोळ्यात पाणी आणणारा VIDEO, एकदा पाहाच काय खातेय ही तरुणी.

  • Share this:

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने चहामध्ये इडली बुडवून खाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लोकांनी त्या व्हिडिओवर बरीच टीका केली होती. इडली-सांबार भारतात खूपच पसंत आहे. आता तर एका मुलीने तंदुरी चिकन चहामध्ये बुडवून खाल्ले. ते पाहिल्यानंतर लोक खूप संतापले आहेत.

एका रेडिट युझरने व्हिडिओ अपलोड करत, "मित्रांनो, मी जेव्हा चहा आणि इडलीचा व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा तुम्ही लोक म्हणाले की आपण चिकनता लेग पीस आणि चह खाऊन बघा. त्यामुळं मी तुमच्यासाठी तंदुरी चिकन आणि चहा खाऊन बघत आहे. मला हे अजब कॉम्बिनेशन आवडले”, असे लिहिले आहे.

वाचा-रितेश-जेनेलियाचा लातूरच्या शेतातला TikTok VIDEO व्हायरल, एकदा पाहाच!

Hey, Guys! When I posted the tea & idli video, u/wromit suggested that I should try "tandoori leg" with tea. I couldn't find a leg piece, but I found what they call "Tikka." At first, I wasn't too sure about it, but after I tried it, I'm really digging the flavor. The after-taste was decent. from r/india

वाचा-VIDEO : शिंगांसह फुटबॉल खेळू लागलं हरिण, गोल केल्यानंतर केलं भन्नाट सेलिब्रेशन!

या व्हिडीओमध्ये असे दिसते आहे की ती मुलगी कपमध्ये तंदुरी चिकन टिक्का टाकून त्यावर चहाही टाकते. मग ती एक चमचा घेते आणि तंदुरी टिक्का खातो. काही लोकांना हा व्हिडिओ अजिबात आवडलेला नाही, एका युझरने, "तु काय केले? कृपया जगावर दया करा आणि लोकांना जगू द्या", असे कॅप्शन दिले आहे.

वाचा-चक्क मेंढीने घातली ब्रा, हे आहे सोशल मीडियावर VIRAL झालेल्या फोटो मागचे रहस्य

चहासोबत इडली खाण्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल

दक्षिण भारतीय पदार्थ इडली-सांबर, वडा आणि डोसा केवळ आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही खाल्ले जातात. सकाळी नाश्त्याला हे पदार्थ विशेषत: खाल्ले जातात. इडली हा पदार्थ जवळजवळ संपूर्ण भारतात सकाळी खाल्ला जातो, तसेच हा पदार्थ आवडीनं खाल्ला जातो. मात्र अलीकडेच सोशल मीडियावर चहासोबत इडली खाणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2020 08:51 AM IST

ताज्या बातम्या