Home /News /entertainment /

रितेश-जेनेलियाचा लातूरच्या शेतातला TikTok VIDEO व्हायरल, एकदा पाहाच!

रितेश-जेनेलियाचा लातूरच्या शेतातला TikTok VIDEO व्हायरल, एकदा पाहाच!

कारण ज्या चित्रपटाच्या निमित्तानं हे दोघे पहिल्यांदा एकत्र आले त्या चित्रपटाला आज 17 वर्ष पूर्ण झाली आहे.

  मुंबई, 03 जानेवारी :  अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलीय ती TikTok व्हिडिओमुळे. कारण ज्या चित्रपटाच्या निमित्तानं हे दोघे पहिल्यांदा एकत्र आले त्या चित्रपटाला आज 17 वर्ष पूर्ण झाली आहे. आणि त्याच्याच आठवणींच्या निमित्तानं ह्या जोडीचे तुफान व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया. ह्या जोडीनं मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चुणूक तर दाखवून दिली. ऑफ स्क्रीनही त्यांना पाहिल्यावर जोडी 'रब ने बना दी' जोडी असंच वाटतं.
  @riteishd

  #tujhemerikasam #palpalsochmeinanana @geneliad reliving 17 yrs of TMK - make your own videos

  ♬ original sound - riteishd
  ह्या दोघांची लव्हस्टोरी ज्या चित्रपटाच्या सेटवर खुलली त्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाला 3 जानेवारीला 17 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे दोघांनी मिळून खास व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी ट्वीटरवरून पोस्ट केले. तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची भेट झाली आणि नंतर ते विवाहबंधनात अडकले. रितेशचा हा पहिलाच पदार्पणाचा चित्रपट होता. या चित्रपटाला १७ वर्ष पूर्ण झाले असून याचं शिर्षक गीताचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  @riteishd

  17 Years Of #tujhemerikasam @geneliad - use the song -make your own videos

  ♬ original sound - riteishd
  चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी याच चित्रपटातील टायटल सॉंग चे चित्रीकरण हे रितेश देशमुख यांच्या मुळगावी म्हणजे बाभळगाव इथं करण्यात आले असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून ह्या दोघांकडे पाहिलं जातं.तर रितेशनं आपल्या टिकटॉक अकाऊंटवरून दोघांचे व्हिडिओजही पोस्ट केले आहे. रितेश आणि जेनलियाच्या व्हिडिओला लाखो व्ह्युज मिळाले आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या