जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आगीतून फुफाट्यात! तरुणाने 9 सेकंदात दोनदा स्वतःचाच 'मृत्यू' पाहिला; Shocking Video

आगीतून फुफाट्यात! तरुणाने 9 सेकंदात दोनदा स्वतःचाच 'मृत्यू' पाहिला; Shocking Video

9 सेकंदात तरुणाचा दोनदा अपघात.

9 सेकंदात तरुणाचा दोनदा अपघात.

एका अपघातातून वाचता वाचता तरुणाचा त्याचवेळी लगेच दुसरा अपघात झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 ऑगस्ट : काही वेळा आपण एका संकटातून बाहेर पडतो न पडतो की दुसरं संकट आपल्यासमोर आ वासून उभं राहतं किंवा एका संकटातून बाहेर काढणारा मार्गच दुसऱ्या संकटात टाकतो. याला आगीतून फुफाट्यात पडणं असं म्हणतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण एका संकटातून दूर पळत असताना दुसऱ्या संकटात अडकला. अवघ्या 9 सेकंदातच त्याने दोन वेळा स्वतःचाच मृत्यू समोर पाहिला. सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात एका तरुणाचा एकाच वेळी दोन वेळा अपघात झाला. एका अपघातातून तो कसाबसा वाचला आणि त्यातून बाहेर पडत असताना त्याचा तिथंच लगेच दुसऱ्यांदा अपघात झाला. आधी तो स्वतःच्या बाईकवरून पडला. त्यावेळी समोरून एक कार येत होती म्हणून तो पळाला आणि त्यानंतर दुसऱ्या बाईकने त्याला उडवलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे वाचा -  वाऱ्याच्या वेगाने आलेल्या कारने उडवल्या 3 गाड्या, बाईकस्वाराला चिरडलं; भयंकर अपघाताचा थरारक LIVE VIDEO व्हिडीओत पाहू शकता तीन तरुण बाईकवरून जात आहेत. त्यांचा बॅलेन्स बिघडचो आणि बाईक कोसळते. रस्त्याच्या मधोमध ते कोसळतात. त्याचवेळी समोरून एक कार येत असते. आता गाडी यांना चिरडते की काय असंच आपल्यालाही वाटतं पण सुदैवाने तिघंही घाईघाईत उठतात आणि रस्त्यावरून बाजूला पळू लागतात. दोघं जण रस्त्याच्या बाजूला होतात पण एक तरुण जसा रस्त्याच्या किनाऱ्यावर येतो तिथंच त्याला दुसरी बाईक धडकते.

जाहिरात

हे सर्व काही अवघ्या 9 सेकंदात घडलं आहे. म्हणजे 9 सेकंदातच तरुणाचा दोन वेळा अपघात झाला. किंबहुना दोन वेळा मृत्यूच त्याच्यासमोर आला असं म्हणायला हरकत नाही. हे त्याचं फुटक नशीब. पण याच दोन्ही अपघातातून तो बचावलं ही त्याची त्याला नशीबाने दिलेली साथच म्हणावी लागेल. हे वाचा -  काळ आला होता पण वेळ नाही! अवघ्या 10 सेकंदावर मृत्यू फक्त 8 पावलांमुळे वाचला जीव; Watch Video @mrwhite321 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात