व्हिडीओत पाहू शकता स्टेजवर नवरा आणि नवरी बसलेले आहेत. फोटोसेशन सुरू आहे. नवरीची बहीण नवरदेवाच्या खुर्चीवर त्याच्या शेजारीच जाऊन बसते. फोटो काढता काढता अचानक ती आपल्या दोन्ही हातांनी नवऱ्याचं तोंड हातात धरते आणि त्याला चक्क किस करते. हा व्हिडीओ पाहून जसं तुम्ही शॉक झालात, तसाच शॉक तिथं उपस्थित असलेल्या सर्वांनाच बसला. नवऱ्याची काय अवस्था झाली ते तर तुम्ही पाहतच आहात. हे वाचा - लग्नात मिळालं असं गिफ्ट; पाहताच नवरी झाली लाजेनं गुलाबी, नवरदेव हैराण लग्नामध्ये अनेक मजामस्ती होत असते. असे बरेच प्रसंग होतात. पण असा प्रसंग तुम्ही कदाचित पाहिलाच नसेल. शिवाय लग्नानंतर काही नाती अशी असतात, ज्यांना तोडच नसते. या नातीच मजामस्तीवर असात. ते नातं म्हणजे दीर-वहिनीचं आणि भावोजी-मेहुणीचं. भावोजी-मेहुणीमधील असे मजेशीर व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण असा व्हिडीओ कदाचित नाहीच. हे वाचा - WOW! सुकलेल्या पानाचं चक्क बनलं सुंदर फुलपाखरू; विश्वास बसत नाही मग पाहा VIDEO या मेहुणीनं असं अचानक का केलं, तिला काय सुचलं माहिती नाही. हा व्हिडीओ पाहून जितका धक्का बसला आहे, तितकंच तुम्हाला हसूही आलं असेल. हो ना!View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video