जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ऑनलाईन ओळख, सोबत घालवली एक रात्र; पहिल्या भेटीतच तरुणीने तरुणाला केलं 'उद्ध्वस्त'

ऑनलाईन ओळख, सोबत घालवली एक रात्र; पहिल्या भेटीतच तरुणीने तरुणाला केलं 'उद्ध्वस्त'

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

ऑनलाईन ओळख झालेल्या तरुणीने पहिल्या भेटीतच तरुणासोबत असं काही केलं की तो पुरता हादरला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 24 सप्टेंबर : हल्ली जोडीदार किंवा पार्टनर निवडण्यासाठी डेटिंग साइट किंवा डेटिंग अॅपसारखे पर्याय उपलब्ध आहेत. अशाच डेटिंग अॅपवर एका तरुणाची एका तरुणीसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघंही भेटले. त्यांनी एकमेकांसोबत एक रात्र घालवली. पण या पहिल्या भेटीतच तरुणीने तरुणासोबत असं काही केलं की तो त्या एका रात्रीतच उद्ध्वस्त झाला. अमेरिकेच्या लॉस वेगासमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. रिगन पार्कर नावाची तरुणी आणि मिआ नावाचा तरुण दोघं डेटिंग अॅपवर भेटले. त्यांच्यात ऑनलाईन चॅटिंग झाली. त्यानंतर दोघांनीही भेटायचं ठरवलं. एका लक्झरी हॉटेलमध्ये ते भेटले. तिथं त्यांनी डिनर केलं आणि नंतर हॉटेलच्या एका खोलीत केले. तिथं एक रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी मिआचा डोळा उघडला तेव्हा जे दिसलं ते पाहून त्याची झोपच उडाली. त्याला मोठा झटका बसला, तो पुरता हादरला. हे वाचा -  ऑनलाईन डेटिंग तरुणाला पडलं महागात; महिलेनं 8 लाख रुपये लुटले, मग चाकू गळ्यावर ठेवला अन्… त्याचं रोलेक्स वॉच आणि 3 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम गायब होती. रिगरही खोलीत नव्हती. त्याने तिला फोन केला तर तिचा फोनही बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. रिगर मिआला लुटून तिथून पसार झाली होती. तिने त्याला उद्ध्वस्त करून टाकलं होतं.

News18लोकमत
News18लोकमत

मिआने पोलिसात तक्रार केली. रिगरने आपल्याला 20 लाख रुपयांचा चुना लावल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. अखेर ती सापडली. पोलिसांनी तिला चोरीच्या आरोपात अटक केली. तपासादरम्यान तिच्यावर आधीच 8 गुन्हे दाखल असल्याचं उघड झालं. ऑनलाईन डेटिंग करताना काय खबरदारी घ्यावी? ऑनलाईन डेटिंगच्या फसवणुकीचे अशी बरीच प्रकरणं आहेत. तुम्हीही ऑनलाईन डेटिंग करत असाल किंवा करणार असाल आणि तुमची फसवणू होऊ नये, यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा. हे वाचा -  Sextortion | तुम्हाला व्हिडीओ कॉलमध्ये इंटरेस्ट आहे का? या एका वाक्याने अनेकांचं आयुष्य झालं उध्वस्त! 1) इंटरनेटवर कुठल्याही अनोळखी व्यक्तीला तुमची सगळी माहिती देऊ नका. तुम्हा ज्या व्यक्तीला निवडणार आहात त्याच्याशी हातचं राखून बोला. तुमच्या घरचा पत्ता, मित्र-मैत्रिणींचे पत्ते, नंबर, तुमच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाच्या घटना याबाबत जास्त माहिती देऊ नका. . अनोळखी व्यक्तीशी बोलताना सतत अलर्ट राहाणं आवश्यक आहे. 2) फोटो शेअर करताना काळजी घ्या. तुम्ही ज्याच्याशी बोलत आहात त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीनं तुमच्या फोटोचं कितीही कौतुक केलं तरीही त्याला तुमचे इतर फोटो शेअर करू नका. तुमच्या घरातील, मित्र-मैत्रीणींसोबतचा, ऑफिसमधला फोटो शेअर करू नका. त्यामुळे तुमची नकळत माहिती समोरच्या व्यक्तीला मिळत असते. हे वाचा -  8 बायका, एकाचवेळी केली अशी डिमांड; एकट्याने पूर्ण करता करता नवऱ्याला फुटला घाम 3) भेटण्याची घाई करू नका. तुम्हाला जोपर्यंत विश्वास होत नाही तोपर्यंत एकमेकांना भेटण्याची गडबड करू नका. तुम्ही अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या. कमीत कमी दोन आठवडे थांबा आणि त्यानंतर भेटण्याबाबत निर्णय घ्या. ऑनलाइन चॅटिंगपेक्षा फोनवर बोलण्याला प्राधान्य द्या. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज तुम्हाला लावता येईल. 4) सार्वजनिक ठिकाणी भेटा. पहिल्या काही भेटी सार्वजनिक ठिकाणी होतील याची कटाक्षानं काळजी घ्या. कॅफे, पार्क, मंदिर, हॉटेल्स अशा ठिकाणी भेटणं सुरक्षेच्या दृष्टीनं फायद्याचं ठरेल. कुठल्याही मोहाला बळी पडू नका. प्रवासासाठी सार्वजनिक वाहनाचा वापर करा. पहिल्याच भेटीत फोटो काढणं टाळा. हे वाचा -  हॉटेलमध्ये GF सोबत रोमान्स करत होता नवरा; बायकोने रंगेहाथ पकडून तिथंच दोघांना…; पाहा VIDEO 5) सुरुवातीच्या काळात अति जवळीक टाळा. जोपर्यंत तुम्हाला समोरच्या व्यक्तीबाबत ठाम विश्वास वाटत नाही तोपर्यंत मित्र-मैत्रिणींना भेटवणं, घरचे पत्ते देणं टाळा. सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये व्यक्तीच्या मनाचा आणि त्याच्या वागण्या बोलण्याचा अंदाज घ्या. नकळत बोलतं करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या अनुभवांवरून निष्कर्ष काढू नका. 6) असुरक्षित किंवा संशयास्पद वाटल्यास वेळीच सावध व्हा. काही वेळा ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपमधील व्यक्तीशी बोलल्यानंतर किंवा एखाद्या भेटीनंतर संशयास्पद किंवा तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तर तुम्ही तुमची मैत्री त्या क्षणी थांबवायला हवी. कोणतीही जोखीम उचलण्याचं नको ते धाडस आपल्या अंगाशी येऊ शकतं. त्यामुळे विचारपूर्वक आणि सावधगिरी बाळगून निर्णय घेणं आपल्या हिताचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात