जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 8 बायका, एकाचवेळी केली अशी डिमांड; एकट्याने पूर्ण करता करता नवऱ्याला फुटला घाम

8 बायका, एकाचवेळी केली अशी डिमांड; एकट्याने पूर्ण करता करता नवऱ्याला फुटला घाम

8 बायका, एकाचवेळी केली अशी डिमांड; एकट्याने पूर्ण करता करता नवऱ्याला फुटला घाम

एकाच वेळी 9 महिलांशी लग्न करणारी ती व्यक्ती आता पुन्हा चर्चेत आली आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

साओ पाओला, 22 सप्टेंबर :  एकाच वेळी नऊ जणींशी लग्न करून चर्चेत आलेली व्यक्ती सध्या पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्याच्या इतक्या बायकांनी त्याच्याकडे एकाच वेळी अशी डिमांड केली की ती पूर्ण करता करता त्याला घाम फुटला आहे. आपल्या पत्नींची हौस पूर्ण करण्यासाठी तो तासनतास घाम गाळतो आहे. ब्राझीलमध्ये राहणारा आर्थर ओ उरसोने 9 महिलांसोबत एकाच वेळी लग्न केलं. आता त्याच्या सर्व पत्नींनी त्याला त्याची बॉडी सुदृढ बनवायला सांगितली आहे. त्यांना त्याचे 6 पॅक अॅब्ज हवेत आहेत. आर्थर म्हणाला, माझ्या पत्नींना वाटतं की मी शेपमध्ये असावं. तर मी तसं नाही केलं तर मला त्यांचं लेक्चर ऐकावं लागतं. हे वाचा -  हॉटेलमध्ये GF सोबत रोमान्स करत होता नवरा; बायकोने रंगेहाथ पकडून तिथंच दोघांना…; पाहा VIDEO आपल्या पत्नींची डिमांड आर्थरने फारच मनावर घेतली आहे. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो खूप मेहनत घेतो आहे. जिममध्ये जाऊन घाम गाळतो. ऑलिम्पिक अॅथलेट्स करतात त्या एक्सरसाइझ तो करतो. यात मॅरेथॉन, क्रॉस फिट, 3 तास वेट ट्रेनिंग आणि रनिंगचा समावेश आहे. डाएटही काटेकोरपणे पाळतो. ब्रेड, पास्ता खात नाही.

News18लोकमत
News18लोकमत

मिररच्या रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांपासून आर्थर स्पॉर्नसेक्शुअल म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. म्हणजे असे लोक जे आपल्या लूकवर खूप लक्ष देतात.आर्थर स्वतःकडे इतकं लक्ष देतो आहे की त्यामुळे त्याच्या काही पत्नी त्याचा द्वेष करत असल्याचंही त्यानं सांगितलं. हे वाचा -  ‘महिन्याला 2 लाख सॅलरी देतो पण अशीच GF हवी’, पठ्ठ्यांनी गर्लफ्रेंडसाठी चक्क जाहिरात दिली आर्थरच्या 9 पत्नी होत्या. त्यापैकी एक त्याला सोडून गेली. या पत्नींसोबत रोमान्स करण्यासाठी त्याने एक वेळापत्रकही तयार केलं आहे. त्यानुसार तो त्यांना वेळ देतो. आर्थर आपल्या वैवाहिक आयुष्याचे अपडेट्स सोशल मीडियावर देत असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात