नवी दिल्ली 29 ऑगस्ट : आजपर्यंत तुम्ही अशा अनेक बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील की लग्नातील (Marriage) आनंदाचं वातावरण अचानक दुःखात बदललं. अशीच एक घटना आता ब्रिटनमधून (Britain) समोर आली आहे. एक तरुणी नवरीच्या वेशभूषेत थेट स्मशानभूमीत पोहोचली, हे पाहून सगळेच हैराण झाले. सुरुवातीला तर कोणालाच काही समजलं नाही मात्र नंतर संपूर्ण घटना ऐकल्यावर सगळ्यांचेच डोळे पाणावले. लग्नाची ही बातमी सध्या व्हायरल (Viral Wedding News) होत आहे. BF सोबत 5 स्टार हॉटेलमध्ये गेली तरुणी; जेवणाचा फोटो अन् किंमत पाहून बसेल धक्का द सननं दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या लाइमेरिकमधील एस्केटन कब्रिस्तान एक तरुणी नवरीच्या वेशभूषेत (Bride In Kabristan) पोहोचली. या तरुणीचं नाव केट क्विलिंगन असून तिचं वय केवळ 20 वर्ष आहे. ही तरुणी नवरीप्रमाणं सजून आपल्या हातांमध्ये फुलांचा गुलदस्ता घेऊन थेट कब्रिस्तानात पोहोचली. तिचं लग्न आपला 20 वर्षीय बॉयफ्रेंड माइल्स माइले याच्यासोबत होणार होतं. रस्त्यावरच वहिनीसोबत भिडला दीर; दोघांनीही एकमेकांची काठीनं केली धुलाई, VIDEO व्हायरल झालेल्या वृत्तानुसार, नवरदेव तयार होऊन लग्नमंडपात जाण्यासाठी चर्चच्या रस्त्यावरून जात होता. इतक्यात त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. हा तरुण कारच्या पुढच्या सीटवर बसलेला होता. या घटनेत त्याला आपला जीव गमवावा लागला (Groom Died in Car Accident). तरुणी हा धक्का सहन करू शकली नाही आणि नवरीच्या वेशभूषेतच ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कब्रिस्तानात पोहोचली. लोकांना जेव्हा या दुर्घटनेची माहिती मिळाली तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले. लग्नाचं हे आनंदी वातावरण क्षणार्धात मोठ्या दुःखात बदललं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.