जाहिरात
मराठी बातम्या / Viral / प्रियकराने दुसऱ्या तरुणीवर खर्च केले 50 लाख रूपये; समजताच गर्लफ्रेंडने केली अशी अवस्था

प्रियकराने दुसऱ्या तरुणीवर खर्च केले 50 लाख रूपये; समजताच गर्लफ्रेंडने केली अशी अवस्था

प्रियकराने दुसऱ्या तरुणीवर खर्च केले 50 लाख रूपये; समजताच गर्लफ्रेंडने केली अशी अवस्था

या खेळाडूने आपल्या प्रेयसीची फसवणूक (Cheating in Love) करून दुसऱ्या महिलेवर 50 लाख रुपये खर्च केले. खेळाडूच्या गर्लफ्रेंडला याची माहिती मिळताच तिने तात्काळ हे नातं संपवले आणि ब्रेकअप करून ती त्याच्यापासून वेगळी झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 जून : सध्या एका खेळाडूचा किस्सा चांगलाच प्रसिद्ध होत आहे. या खेळाडूने आपल्या प्रेयसीची फसवणूक केली, यानंतर तिने त्याला असा धडा शिकवला जो हा खेळाडू आयुष्यभर लक्षात ठेवेल. या खेळाडूने आपल्या प्रेयसीची फसवणूक (Cheating in Love) करून दुसऱ्या महिलेवर 50 लाख रुपये खर्च केले. खेळाडूच्या गर्लफ्रेंडला याची माहिती मिळताच तिने तात्काळ हे नातं संपवले आणि ब्रेकअप करून ती त्याच्यापासून वेगळी झाली. ‘द सन’च्या वृत्तानुसार, या ब्रिटीश खेळाडूचं नाव समोर आलेलं नाही, मात्र तो प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू असून थ्री लायन्स क्लबचा भाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. या खेळाडूच्या गर्लफ्रेंडने फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अशी शिक्षा दिली की आता तो एकटा पडला आहे. जिवंतपणी नाही पण मरणानंतर झाले एक; गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी केलं लग्न; कारण वाचून डोळ्यांत येईल पाणी हा खेळाडू त्या दुसऱ्या महिलेसोबत घरूनही चॅट करत असे. एके दिवशी तो आंघोळीला जात असताना आपला मोबाईल बाथरूममध्ये घेऊन जायला विसरला. त्यानंतर अचानक गर्लफ्रेंडने त्याचा मोबाईल तपासला आणि त्याची पोलखोल झाली. चॅटसोबतच त्या दोघांचे अनेक फोटोही गर्लफ्रेंडला त्याच्या मोबाईलमध्ये दिसले. जेव्हा गर्लफ्रेंडने त्याला याबद्दल विचारलं तेव्हा तो वेगळीच उत्तरं देऊ लागला. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे, की ही पहिली वेळ नव्हती जेव्हा त्याने अशाप्रकारे धोका दिला. याआधीही त्याने असं केलं होतं. मात्र आता यावेळी त्याची गर्लफ्रेंड त्याला माफ करण्याच्या मूडमध्ये नव्हती. अखेर तिने ब्रेकअप केला आणि त्याच्यापासून वेगळं राहू लागली. अचानक गायब झालेल्या बॉयफ्रेंडच्या शोधात निघाली तरुणी; समोर आलं असं सत्य की पुरती हादरली गर्लफ्रेंडला त्याच्यावर संशय तेव्हा येऊ लागला जेव्हा तो वारंवार घरी उशिरा यायला लागला. तो आपला फोनही सुरक्षित ठिकाणी ठेवत असे. कोणाला फोनला हातही लावू देत नसे. एकदा त्याच्या शरीरावर लेडीज परर्फ्यूमचा सुगंधही आला. तेव्हाही त्याने काहीतरी कारण सांगत ही वेळ मारून नेली. मात्र अखेर जेव्हा गर्लफ्रेंडने मोबाईल चेक केला, तेव्हा त्याची पोलखोल झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात