जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नेमकी भानगड काय? भरमंडपात नवरदेवाची तरुणीने केली धुलाई; पाहत राहिली नवरी

नेमकी भानगड काय? भरमंडपात नवरदेवाची तरुणीने केली धुलाई; पाहत राहिली नवरी

लग्नमंडपात नवरदेवाला मारहाणा

लग्नमंडपात नवरदेवाला मारहाणा

लग्नाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल पण हसूही आवरणार नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑगस्ट : लग्नात (Wedding) रुसवे-फुगवे असतात. पण कधी कधी असं काहीतरी होतं की ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल (Wedding video) . सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एका तरुणीने भरमंडपात नवरदेवाची धुलाई केली आहे (Girl beating groom). व्हिडीओ पाहूनच शॉक व्हाल. लग्नमंडपात एका तरुणीने चांगलाच धिंगाणा घातला आहे. नवरदेवाला ती मारताना दिसली. हा सर्व प्रकार पाहून नवरीही शॉक झाली आहे. नेमकं काय घडतं आहे, हे तिलाही समजेना.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता, स्टेजवर नवरदेवाच्या आजूबाजूला बरीच मंडळी आहेत. एका तरुणी नवरदेवासोबत भांडताना दिसते आहे. हे वाचा -  VIDEO - लग्नाच्या दिवशीच नवरीमुळे झाले हाल; नवरदेवाला अक्षरश: फुटला घाम नवऱ्याला ती धक्का देते आहे. नवऱ्याच्या कॉलरला तिने हात घातला, त्याचा ड्रेस खेचताना दिसते. इतकंच नव्हे तर ती त्याच्या डोक्यावरील फेटाही काढून फेकते. नवरदेवाच्या शेजारी असलेले आणखी काही तरुणही त्याला धक्का देताना दिसत आहेत. तर काही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व होत असताना नवरीसुद्धा तिथं आहे. ती या सर्वांच्या मागे शांत उभी आहे. कदाचित तिलासुद्धा समजत नसावं की नेमकं काय होतं आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सही शॉक झाले आहे. ही नेमकी भानगड काय आहे? ही लग्नातील कोणती परंपरा आहे की नवरदेवाचं लफडं? काहीच समजत नाही आहे. हे वाचा -  VIDEO - मित्राने नवरदेवाला दिलं असं गिफ्ट; नेटिझन्स म्हणाले, आता कमाईची गरज नाही official_niranjanm87 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून जितका धक्का बसतो, तितकंच हसूही येतं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात