• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO - लग्नाच्या दिवशीच नवरीमुळे झाले हाल; नवरदेवाला अक्षरश: फुटला घाम

VIDEO - लग्नाच्या दिवशीच नवरीमुळे झाले हाल; नवरदेवाला अक्षरश: फुटला घाम

लग्नाच्या दिवशीच नवरीमुळे मोडलं नवरदेवाचं कंबरडं.

लग्नाच्या दिवशीच नवरीमुळे मोडलं नवरदेवाचं कंबरडं.

नवरदेवाची अवस्था पाहून नवरीलाही आवरलं नाही हसू.

 • Share this:
  मुंबई, 17 ऑगस्ट : लग्नात (Wedding) नवरा-नवरीमधील (Bride groom) रोमँटिक क्षणाप्रमाणे काही मजेशीर क्षणही असतात. असाच नवरा-नवरीचा (Bride groom video) एक मजेशीर (Wedding video) व्हिडीओ (Funny wedding video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात नवरदेवाची (Groom video) चांगलीच फजिती झाली आहे. नवरदेवाची लग्नातच अशी अवस्था पाहून नवरीलाही (Bride video) हसू आवरलं नाही. लग्नात असे काही विधी असतात जे मजेशीर असतात. अशाच विधींपैकी एक विधी करताना नवरदेवाची जी अवस्था झाली ती पाहण्यासारखी आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
  व्हिडीओत पाहू शकता नवरी स्टेजवर एका ठिकाणी मांडी घालून बसली आहे. नवरदेवाला नवरीला तसंच उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचं असतं. हे वाचा - VIDEO - मित्राने नवरदेवाला दिलं असं गिफ्ट; नेटिझन्स म्हणाले, आता कमाईची गरज नाही नवरदेव नवरीला उचलायला जातो. पण सुरुवातीला त्याच्याने नवरी काही उचलत नाही. नवरीलाही हसू येतं. ती खळखळून हसताना दिसते. व्हिडीओत आवाज ऐकला तर तिथं उपस्थित मंडळी नवरदेवाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे. कसंबसं करत नवरा नवरीला उचलतो आणि बाजूला बसवतो. त्यावेळी तो किंचितसा नवरीवर पडतोही. त्यानंतर उभं राहून तो मोठा श्वास घेतो. नवरी मात्र हसतच राहते. हे वाचा - VIDEO - अरे हिला झालंय तरी काय? पाठवणीवेळी नवरीचा अवतार पाहून वऱ्हाडी शॉक निरंजन महापात्रा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. अजून पूर्ण आयुष्य बाकी आहे, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: