Home /News /viral /

चाऱ्यासह जिराफाने मुलालाही जबड्यात पकडून वरती ओढलं अन्...; थरकाप उडवणारा VIDEO

चाऱ्यासह जिराफाने मुलालाही जबड्यात पकडून वरती ओढलं अन्...; थरकाप उडवणारा VIDEO

व्हायरल होणारा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे, जे प्राणिसंग्रहालयात जाऊन तिथल्या प्राण्यांना काहीतरी खाऊ घालण्याचा विचार करतात. पाहायला गेलं तर हे काम अतिशय चांगलं आहे. मात्र अनेकदा ते तुमच्यासाठी घातक ठरतं

  नवी दिल्ली 06 मार्च : एखाद्या उपाशी किंवा भुकेल्याला अन्न देणं, हे अतिशय चांगलं काम असतं असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हेच पुण्याचं काम करत असताना अशा काही घटना घडतात, ज्यांच्याबद्दल कदाचित कोणी विचारही केलेला नसतो. विशेषतः जेव्हा तुम्ही एखाद्या प्राण्याच्या समोर उभे असतात. प्राण्यांच्या समोर अनेकदा आपली अगदी छोटी चूकही भरपूर महागात पडते. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ (Giraffe Shocking Video) सध्या समोर आला आहे. यात एक लहान मुलगा जिराफाला चारा देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत जे काही घडतं, त्याचा त्याने विचारही केला नसेल.

  VIDEO - रॉक क्लायम्बिंगवेळी स्टंट पडला भारी! भल्यामोठ्या दगडाला धडकला आणि...

  हा व्हायरल होणारा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे, जे प्राणिसंग्रहालयात जाऊन तिथल्या प्राण्यांना काहीतरी खाऊ घालण्याचा विचार करतात. पाहायला गेलं तर हे काम अतिशय चांगलं आहे. मात्र अनेकदा ते तुमच्यासाठी घातक ठरतं. सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ असाच आहे. यात दिसतं की एक लहान मुलगा जगातील सर्वात लांब प्राणी असलेल्या जिराफाला काहीतरी चारा देण्याचा विचार करतो. मात्र त्याच्यासोबत भलतंच काहीतरी घडतं. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा मुलगा जिराफाला खाण्यासाठी एक लहान फांदी देतो. मात्र जिराफ त्या फांदीसह मुलाला वरती उचलतं. तिथे उपस्थित पालकही हे दृश्य पाहून घाबरतात आणि लगेचच आपल्या मुलाचा पाय पकडून त्याला खाली ओढतात. यामुळे या मुलासोबत काहीही दुर्घटना घडत नाही.

  घराच्या छतावरील 15 फूट लांब कोब्राला शेपटीला धरून खेचलं अन्.., Shocking Video

  हा हैराण करणारा व्हिडिओ ट्विटरवर @Laughs_4_All नावाच्या अकाऊंटवरुन शेअऱ केला गेला आहे. बातमी देईपर्यंत जवळपास 4 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत आपली प्रतिक्रियाही दिली आहे. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, जंगली प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा आणि त्यांना काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न कधीच करू नका. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला हसू येतंय आणि रागही. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Wild animal

  पुढील बातम्या