जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - म्हशीवर हल्ला केल्याने चवताळला रेडा; चक्क सिंहांनाही शिंगावर धरून आपटलं

VIDEO - म्हशीवर हल्ला केल्याने चवताळला रेडा; चक्क सिंहांनाही शिंगावर धरून आपटलं

VIDEO - म्हशीवर हल्ला केल्याने चवताळला रेडा; चक्क सिंहांनाही शिंगावर धरून आपटलं

रेड्याचा रुद्रावतार पाहून सिंहांनीही ठोकली धूम.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 सप्टेंबर : आपल्या प्रिय व्यक्तीला कुणी काही केलं तर आपल्याला किती राग येतो. हे फक्त माणसांमध्येच नाही तर अगदी प्राण्यांमध्येही दिसून येतं. जसं प्राण्यांमधील आई (Animal love) आपल्या पिल्लांचं रक्षण करताना दिसते, तसंच प्राण्यांमधील जोडीदारही (Animal video) एकमेकांचं रक्षण करत असतात (Animal fighting video). प्राण्यांमधील मायेप्रमाणे आता हा प्रेमाचा व्हिडीओही सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. एका रेड्याने म्हशीसाठी थेट सिंहांशीही लढा दिला आहे (Buffalo Attacks Lions). सिंहाच्या कळपावर हल्ला (Lions Attacks Buffalo) करणाऱ्या एका रेड्याचा (Lion buffalo video) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या सिंहांनी म्हशीवर हल्ला केला तेव्हा रेड्याने सिंहांना चांगलाच धडा शिकवला आहे.

जाहिरात

दक्षिण आफ्रिकेतील हा व्हिडीओ आहे. मालामाला गेम रिझर्व्हच्या (MalaMala Game Reserve) इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा -  बापरे! महाकाय सापाने तरुणाला घातला वेटोळा आणि…; थरकाप उडवणारा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एका म्हशीला सिंहांच्या कळपाने घेरलं आहे. सिंहांनी म्हशीवर हल्ला केला आहे. कुणी तिचा पाय धरला आहे तर कुणी तिच्या पाठीवर बसून जबड्याने तिचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहे. आता या म्हशीचं काही खरं नाही. ती काही सिंहाच्या तावडीतून सुटत नाही असंच आपल्याला वाटतं. पण थांबा ही तर फक्त सुरुवात आहे. खरा पिक्चर अजून बाकी आहे. आता पुढे एंट्री होते ती म्हशीच्या हिरोची म्हणजे रेड्याची. म्हशीच्या जोडीदाराने म्हणजे रेड्याने म्हशीवर सिंहांनी हल्ला केल्याचं पाहिलं आणि तो चवताळला. आपल्यासमोर कोण आहे याची पर्वा न करता तो म्हशीला वाचवण्यासाठी वेगाने धावत आला. त्याने पळत पळतच सिंहाला आपल्या शिंगावर धरसलं आणि धाडकन जमिनीवर आपटलं. रेड्याचा रुद्रावतार पाहून सिंहसुद्धा घाबरले. सर्वच्या सर्व सिंह तिथून धूम ठोकून पळाले. हे वाचा -  मासे पकडायला गेला पण माशानेच पाण्यात खेचून घेतलं आणि…; धडकी भरवणारा VIDEO एकटा रेडा या सर्व सिंहांना चांगलाच भारी पडला. सर्व सिंहांना त्याने एकट्याने सरो की पळो करून सोडलं. एका क्षणात त्याने बाजी पलटवली आणि आपल्या जोडीदाराचा जीव वाचवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात