मराठी बातम्या /बातम्या /Viral /

निसर्गरम्य परिसरात तयार घरं, बीचही आहे जवळ; या शहरात राहण्यासाठी सरकारच तुम्हाला देतंय 25 लाख रुपये

निसर्गरम्य परिसरात तयार घरं, बीचही आहे जवळ; या शहरात राहण्यासाठी सरकारच तुम्हाला देतंय 25 लाख रुपये

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

या शहरात तयार घरात राहण्यासाठी सरकारच नागरिकांना पैसे देत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

रोम, 22 नोव्हेंबर : कोणती जमीन, एखादी जागा किंवा घर घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतात पण एखाद्या ठिकाणी राहण्यासाठीच तुम्हाला पैसे मिळत असतील तर... काय आश्चर्य वाटलं ना... पण हे खरं आहे. एका शहरात राहण्यासाठी सरकारच नागरिकांना पैसे देत आहेत. या शहरात राहण्यासाठी सरकारतर्फे नागरिकांना लाखो रुपये ऑफर करण्यात आले आहेत. आता हे शहर नेमकं कुठलं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल.

हे शहर भारतातील नाही. तर दुसऱ्या देशातील आहे आणि हा देश म्हणजे इटली. दक्षिण-पूर्व इटलीतील प्रेसिचे शहर. ज्या ठिकाणी ही घरं आहेत, तिथं निसर्गरम्य दृश्य आहेत. हे शहर ऐतिहासिक आणि अद्भुत वास्तूकलेचं केंद्रही राहिलं आहे. या शहराजवळ सालेंटो शहर आहे. जिथून स्वच्छ पाण्यासह सांता मारिया डी लेऊकातील बीचही पाहायला मिळेल.

हे वाचा - देशातील या सुंदर ठिकाणी भारतीयांनाही प्रवेश नाही; फिरण्यासाठी लागते विशेष परवानगी

या शहरातील नगरसेवक अल्फ्रेडो पालिस यांनी सांगितलं की, पूर्णपणे रिकामी झालेल्या प्रेसिच शहराची अर्थव्यवस्था पुन्हा रूळांवर आणण्यासाठी आम्ही ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत 1991 साली आधी तयार झालेल्या घरं पुन्हा वसवण्याची तयारी आहे. ही घरं त्यांच्या मालकांनी सोडली आहेत.  लवकरच यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रेसिचेच्या वेबसाईटवर सुरू होईल. याबाबत अधिक माहिती तुम्ही वेबसाईटवर चेक करू शकता.

माहितीनुसार या घरांची किंमत 25 हजार यूरो म्हणजे जवळपास 20 लाख रुपये आहे.  इथल्या अधिकाऱ्यांनी या शहरातील रिकामी घरं खरेदी करून त्यात राहणाऱ्या नागरिकांना पैसे देण्याची घोषणा केली आहे. नागरिकांना ते 30 हजार युरो म्हणजे जवळपास 25 लाख रुपये देणार आहेत.

हे वाचा - प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असतात रेल्वे रुळाच्या बाजूला हे बॉक्स, तुम्हाला माहितीय का याचा उपयोग?

इटलीतील एका शहरात राहण्यासाठी देण्यात आलेली ही पहिली ऑफर नाही. याआधीही कलॅब्रियात राहण्यासाठी सरकारने 24.76 लाख रुपयांची ऑफर दिली होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी इथल्या लोकांना नवा व्यवसायही सुरू करण्यास सांगण्यात आलं होतं.

First published:

Tags: Italy, Travel, Viral, Viral news, World news