Home /News /viral /

फक्त एका 6 वर्षांच्या मुलासाठी धावून आले तब्बल 20 हजार Bikers; कारण वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

फक्त एका 6 वर्षांच्या मुलासाठी धावून आले तब्बल 20 हजार Bikers; कारण वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

6 वर्षांच्या मुलासाठी आयोजित करण्यात आलेला हा असा बाईक शो पाहून तुम्ही भावुक व्हाल.

  बर्लिन, 18 फेब्रुवारी : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओत हजारो बाईक रस्त्यावर धावताना दिसत आहेत (20000 bikers on road). आता हा एखादा मोर्चा असावा, आंदोलन असावं, कोणता रोड शो असावा, स्पर्धा असावी किंवा एखाद्या फिल्मचं शूटिंग किंवा फिल्ममधील सीन असावा असं तुम्हाला वाटेल. पण या व्हिडीओबाबतीत यापैकी काही नाही. इतके बाईकर्स रस्त्यावर उतरले आहेत आणि याचं कारण आहे ते म्हणजे फक्त एक 6 वर्षांचा मुलगा  (Thousands of bikers came on road for 6 year old boy). एका 6 वर्षीय मुलासाठी तब्बल 20 हजार बाईक रायडर्स आपल्या बाईक घेऊन रस्त्यावर आले. आता एका मुलासाठी इतक्या लोकांनी एकाच वेळी बाईक का चालवली असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. यामागील कारण तुम्हाला समजलं तर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
  View this post on Instagram

  A post shared by !®️ (@facts_holic_)

  हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा असून तो जर्मनीतील असल्याचं सांगितलं जातं आहे. रॉडरफेनमध्ये गेल्या वर्षी एका 6 वर्षांच्या मुलाला कॅन्सरचं निदान झालं होतं. तो कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात होता. त्याचं वाचणं अशक्यच होतं. त्याला बाईक्स आणि त्यांचा आवाज ऐकायला खूप आवडायचं आणि हीच त्याची शेवटची इच्छा होती (Cancer patient last wish to see bikes). आल्या मुलाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांची धडपड सुरू झाली. त्यांनी यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली. हे वाचा - ...अन् छोट्याशा बछड्यासमोर वाघिणीची हवा टाईट; नेमकं काय घडलं पाहा VIDEO ही पोस्ट पाहून किमान 15-20 लोक तरी आपली बाईक घेऊन येतील, अशी आशा या पालकांना होती. पण जेव्हा त्यांनी प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा तेसुद्धा शॉक झाले (20000 bikers on road for cancer patient Germany). 15-20 लोकांऐवजी 15-20 हजार लोक आपली बाईक घेऊन या मुलाला भेटण्यासाठी आले (Thousands of bikers came to fullfil last wish). या सर्व बाइकर्सनी या मुलासमोर गाडी चालवत त्याला सॅल्युट केलं. या यूट्युब व्हिडीओत त्या मुलाला पाहू शकता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसतो आहे. हे वाचा - आश्चर्य! रस्त्यावरून अचानक हवेत उडू लागली कार; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO गुडबल नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका युझरने कमेंटमध्ये आपण या रॅलीत सहभागी असल्याचं सांगितलं. तसंच या मुलाचा जीव वाचला नाही पण या सर्व लोकांना मुलाला असा आनंद देऊन समाधान मिळाल्याचं सांगितलं. हा व्हिडीओ पाहून लोक इमोशनल झाले आहेत. हा एक व्हायरल व्हिडीओ आहे. जो सर्व सोशल मीडियावर आहे. या व्हिडीओत आणि त्याबाबतच्या माहितीत किती तथ्यता आहे, याची पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाही.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bike riding, Germany, Viral, Viral videos

  पुढील बातम्या