मुंबई २७ नोव्हेंबर : लोकांना कोडी सोडवायला आणि दुसऱ्यांना कोड्यात पाडायला आवडते. लहान मुलं तर आवर्जुन हे करतात. एवढंच काय तर आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या लहानपणी मोठ्यांना किंवा मित्रांना कठीण प्रश्न विचारले असणार. त्याची उत्तर जर त्यांना आली नाही. तर मला खूप येतं आणि मी खूप हुशार अशी भावना मग मनात येते. पण हे असे प्रश्न खेळ म्हणूनच नाहीतर परीक्षेत देखील विचारले जातात.
सरकारी परीक्षा किंवा यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील असे प्रश्न आवर्जुन विचारले जातात. चला तुम्हाला देखील अशा बुचकाळ्यात पाडणाऱ्या प्रश्नांची तोंड ओळख करुन देऊ. जेणे करुन तुम्ही असे प्रश्न तुमच्या मित्रांना विचारु शकता किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर तुम्हाला हे प्रश्न नक्कीच फायदेशीर ठरतील.
हे ही वाचा : अशी गोष्ट जी लोक मृत्यूनंतरही करू शकतात, तुम्हाला माहितीय या प्रश्नाचं उत्तर?
प्रश्न १- प्राचीन काळी उज्जैनचे नाव काय होते?
उत्तर: उज्जैनचे प्राचीन नाव अवंतिका, उज्जयिनी, कनकशृंग इत्यादी आहेत.
प्रश्न २- भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केले?
उत्तर : भारतात इंग्रजी शिक्षण सुरू होण्याचे श्रेय लॉर्ड मेकॉले यांना जाते, त्यांचे पूर्ण नाव थॉमस बेनिंग्टन मेकॉले असे होते.
प्रश्न 3- हरियाणचे हरिकेन म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हरियाणा हरिकेन (वादळ) असे नाव देण्यात आले आहे. ते वेगवान गोलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाज होते. महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून त्यांनी १९८३ क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.
प्रश्न ४- अशी कोणती गोष्ट आहे? जी लोखंड ओढू शकते पण रबर नाही
उत्तर: चुंबक
प्रश्न ५- कोणत्या देशाने फाशीची सक्ती रद्द केली आहे?
उत्तर : मलेशियाने १० जून २०२२ रोजी जाहीर केले की, त्यांनी अनिवार्य मृत्यूदंड रद्द करण्यास सहमती दर्शविली आहे.
प्रश्न ६- अशी कोणती गोष्ट आहे, जे लोक मृत्यूनंतरही करू शकतात?
उत्तर: अवयवदान
प्रश्न ७- राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी कमाल आणि किमान वय किती आहे?
उत्तर: भारतात राष्ट्रपती होण्यासाठी कमाल वय नाही पण किमान वय 35 वर्षे आहे
प्रश्न ८- जगातील कोणत्या देशात सर्वाधिक पोस्ट ऑफिस आहेत?
उत्तर: जगभरातील देशांमध्ये भारतात पोस्ट ऑफिसची संख्या सर्वाधिक आहे. भारतात पोस्ट ऑफिसची संख्या १,५५,६१८ आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news, Social media, Top trending, Viral