जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आजपर्यंत शंभरदा बोलला असाल 'टचवूड', पण असं का बोलतात माहितीय?

आजपर्यंत शंभरदा बोलला असाल 'टचवूड', पण असं का बोलतात माहितीय?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लोक बऱ्याचदा टचवूड हे…, टचवूड ते… असं बोलतात. पण याचा खरा अर्थ काय याचा विचार केलाय?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 28 नोव्हेंबर : आपण लोकांशी संवाद साधताना आपल्याला अनेक नवनवीन शब्दांची ओळख होते. यामुळे आपल्या शब्दांच्या ज्ञानात भर होते. पण असं असलं तरी देखील असे काही शब्द आहेत, ज्याला कुठे वापरायचा हे तर आपल्याला माहित असतं, पण ते का आणि कशासाठी वापरलं जातं हेच कळत नाही. त्यांपैकी एक शब्द आहे ‘‘टचवूड’’. आपण बऱ्याचदा लोकांना बोलताना पाहिलं आहे की, टचवूड हे…, टचवूड ते… आणि आपण देखील असं बोलतो. या शब्दाला आपण ‘नशीब’ या अर्थाने वापरतो. पण जर आपण शब्दशहा विचार केला तर याचा अर्थ लाकडाला स्पर्श करणे असा होतो. पण मग आपण असं का बोलतो? केव्हापासून या शब्दाची सुरुवात झाली? चला रंजक गोष्टीची माहिती घेऊ हे ही वाचा : अशी कोणती गोष्ट आहे, जे लोक मृत्यूनंतरही करू शकतात? तुम्हाला माहितीय या प्रश्नाचं उत्तर या मागची काय आहे मान्यता? तसे पाहाता यामागे अनेक ऐतिहासिक मान्यता असल्याचं सांगतलं जातं. पण काही सर्वात जास्त समोर आलेल्या मान्यतानुसार झाड हे परी, आत्मा आणि इतर प्राण्यांचे निवासस्थान आहेत, अशी पौराणिक समजूत आहे. तर, दोन वेळा लाकडावर थाप मारण्याची परंपरा होती. पहिल्या वेळी झाडाकडे एक इच्छा मागाची आणि दुसऱ्या वेळी त्याचे आभार मानायचे. याशिवाय जगाच्या अनेक भागांत लोक झाडांची पूजा करतात आणि त्याला देवाचे माहेरघर मानतात. अशा रीतीने लाकडाला स्पर्श केल्याने सौभाग्य लाभते, अशी समजूत जन्माला आली. अनेक दंतकथा आणि लोककथा सूचित करतात की लाकडाला स्पर्श करून आपण पवित्र लाकडाला प्रत्यक्षात स्पर्श करीत आहात, जे भाग्य प्राप्त करू शकते आणि देवाकडून स्वत:साठी संरक्षण मिळवण्यासाठी ते मदत करते. पण असं असलं तरी देखील या सर्व फक्त मान्यता आहेत. लाकडाला स्पर्श करणे किंवा ठोकणे ही संपूर्ण कल्पना झाडावर राहणाऱ्या दुष्ट आत्म्यांचे लक्ष विचलित करते, जेणेकरून ते आपल्या भविष्यातील योजना ऐकत नाहीत. ज्यामुळे आपण जे बोलतो, त्या गोष्टी सत्यात उतरत नाही किंवा असं केल्याने आपण त्या गोष्टी होण्यापासून रोखू शकतो. मजेशीर गोष्ट अशी आहे की, तुम्ही जगाच्या कोणत्या भागातील आहात किंवा तुम्ही कोणत्या धर्मावर विश्वास ठेवता हे महत्त्वाचे नाही. टचवूड सारखा शब्द किंवा वाक्य जगाच्या पाठीवर सर्वत्र वापरला जातो. ब्राझीलमध्ये एक वाक्यांश आहे - बेटर ना मदीरा, ज्याचा अर्थ टचवूड असाच आहे. त्याचबरोबर इंडोनेशियातील अमित-अमित या वाक्प्रचाराचा अर्थही तोच आहे. तसेच इराणमधील लोक बेझानम बीचटे असा शब्द उच्चारतात त्याचा अर्थ देखील तोच आहे. ग्रीसमध्ये, मुडिओम असा शब्द वापरतात ज्याचा शब्दशः अर्थ लाकडावर टकटक करणे असा आहे आणि जेव्हा लोकांना कोणतीही नकारात्मक गोष्ट रोखायची असते तेव्हा त्याचा वापर केला जातो.

News18लोकमत
News18लोकमत

म्हणजेच काय तर, नकारात्मक भावनांपासून रक्षण करणे आणि भविष्यासाठी आपल्या आशा-आकांक्षांचे रक्षण करणे आहे, लोक अनेकदा अशा गोष्टी बोलून जातात, ज्या त्याच्या आयुष्यात न होवो अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे ते असा शब्द उचारतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात