नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी: व्हॅलेंटाईन वीकला (Valentines Week) 7 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. अनेकज आपल्या खास व्यक्तीला खुश करण्यासाठी विविध प्लॅन्स आखत असतात. दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक अशी मॉडेल आहे जिच्यासोबत डेटला जाण्यासाठी बोली लावण्यात येत आहे. एका व्यक्तीने चक्क तब्बल 45 लाखांची बोली लावली आहे.
27 वर्षाय या मॉडेलचे नाव एलिझाबेथ मेरी शेव्हलियर असे आहे. या मॉडेलने व्हॅलेंटाईन डेला डेटवर जाण्यासाठी इरोटिका साइट ओन्ली फॅन्सवर बोली लावण्यास सांगितले. तिने 14 फेब्रुवारीला बोली लावण्याचा निर्णय घेतल्यावर तिला आधीच हजारो पौंड मिळाले आहेत आणि भेटवस्तूंचा वर्षाव झाला असल्याचे एलिझाबेथ मेरी शेव्हलियरने एका वृत्तसंस्थेला सांगितले. अमेरिकेची रहिवासी असलेली एलिझाबेथ सध्या व्हॅलेंटाईन डेचे नियोजन करत आहे.
तिच्यासाठी जे लोक किंमत मोजतील त्यांना ती वाइन आणि डिनर देणार आहे. तिने इंस्टाग्रामवर 'लिलाव' ची घोषणा केली आणि याआधीच काही अतिशय आकर्षक ऑफर मिळाल्या आहेत. व्हिडिओ शेअर केल्यापासून एलिझाबेथला साडेसात लाखांपासून ते 45 लाखांपर्यंतच्या ऑफर आल्या आहेत.
इतरांनी प्रेम मिळवण्याच्या आशेने तिला महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव केला आणि काहींनी लग्नासाठी तिचा हातही मागितला. व्हिडिओ अपलोड केल्यापासून तिला व्हॅलेंटाईन डेला डेटवर जाण्यासाठी चाहत्यांकडून खूप ऑफर्स मिळाल्या आहेत.
एलिझाबेथ अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहते. प्लेबॉय आणि मॅक्सिमच्या कव्हर पेजवर तिचा फोटो अनेकदा झळकला आहे. इंस्टाग्रामवर तिचे 30 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड मिळत नसल्याची खंत तिने व्यक्त केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news