नवी दिल्ली 27 जून : पंचतारांकित हॉटेलचं (Five Star Hotel) कौतुक सांगणारे असंख्य मीम्स (Memes) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जमिनीवरील हॉटेल, तेथील सुविधांचे अनेकांना आकर्षण असतं. परंतु, हवेत उडणाऱ्या हॉटेलबद्दल (Flying Hotel Plane) कदाचितच कुणी ऐकलं असेल. पण भविष्यात हवेतील उडतं हॉटेलही अस्तित्वात येऊ शकतं. एका युट्युब चॅनेलने (Youtube Channel) चक्क अशा हॉटेलचा संकल्पित व्हिडिओ (Concept Video) समोर आणला आहे. याला पाहिल्यानंतर हवेत उडणाऱ्या हॉटेलची संकल्पना सत्यात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘ आज तक ’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. आपण नेहमी हवेत उडणारी विमानं पाहतो; पण उडणारं हॉटेल म्हटलं की, ही बाब कशी शक्य होईल, असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला पडू शकतो. हाशेम अल-घैली (Hashem Al-Ghaili) या यूट्युब चॅनेलने उडणाऱ्या हॉटेलचा एक कन्सेप्ट व्हिडीओ नुकताच जारी केला आहे. यात न्यूक्लिअर पावर्ड स्काय हॉटेलची (Nuclear-Powered Sky Hotel) संकल्पना मांडण्यात आली आहे. Rashmika Mandanna News: रश्मिका मंदनाने आपल्या डॉगीसाठी मागितलं विमानाचं तिकीट? झाला खुलासा पाच हजारांवर व्यक्तींची होईल सोय यूट्युबच्या या व्हिडीओत उडणाऱ्या हॉटेलची वैशिष्ट्ये सांगितली गेली आहेत. त्यानुसार, हे हॉटेल एका विमानाप्रमाणे असेल. जमिनीवर हे हॉटेल कधी उतरू शकणार नाही. यात 5 हजार व्यक्तींची सोय होऊ शकेल. या हॉटेलमध्ये रेस्टॉरंट (Restaurant), प्रशस्त असा शॉपिंग मॉल (Shopping Mall) जिम (Gym), सिनेमागृह (Theatre) आणि स्वीमिंग पूलची व्यवस्थाही असेल.
विमानांने हॉटेलमध्ये लागणार जावं उडणारं हॉटेल हे आकाशातील क्रूझप्रमाणे (Sky Cruise) असेल. यात 20 इंजिन असतील. ती सर्व न्यूक्लिअर फ्यूजनच्या (Nuclear Fusion) व ऑर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) मदतीनी चालतील. हॉटेल जमिनीवर कधीही लँड होऊ शकणार नाही, अशी या स्काय क्रूझ हॉटेलची रचना असेल. विमानातूनच हॉटेलपर्यंत पोहोचता येईल. हॉटेलच्या देखभालीचं कामही हवेतच करावं लागेल. अणुऊर्जेद्वारे चालणारं ‘स्काय क्रूझ’ भविष्यात येणार असल्याचा दावा युट्युबरकडून करण्यात आला आहे. मैत्रिणीवर जडलं प्रेम, आयुष्यभर सोबत राहण्यासाठी तरुणीकडून लिंगबदल शस्त्रक्रिया दरम्यान, ‘डेली स्टार’नं दिलेल्या वृत्तानुसार उडणाऱ्या हॉटेलचं प्रोजेक्ट खूप मोठं आहे. सध्या यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. न्युक्लिअर पॉवरवर उडणारं हॉटेल निर्माण झालं आणि क्रॅश झाल्यास मोठं शहर उद्ध्वस्त होऊन मोठा विनाश होऊ शकतो. ‘काय झाडी, काय डोंगार अन् काय हॉटेल’ या वाक्यासह सध्या अनेकजण निसर्ग आणि पंचतारांकित हॉटेलच (Five Star Hotel) कौतुक सांगत फोटो सोशल मिडियावर शेअर करत आहेत. हवेत उडणारं हॉटेलही भविष्यात येऊ घातलं असलं तरी याचा लाभ घेणं किती जणांना शक्य होईल, हा मोठा प्रश्न आहे.