लखनौ, 27 जून : प्रेम हे आंधळं असतं. प्रेमात असणाऱ्या व्यक्तीला काय चूक काय बरोबर हेही समजत नाही, असं म्हटलं जातं. अशीच एक वेगळी घटना उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात घडली आहे. मैत्रिणीवर प्रेम जडलेली एक तरुणी चक्क आता तिची ओळख बदलण्यासाठी तयार झाली आहे. प्रिय मैत्रिणीला आयुष्यभर साथ देता यावी म्हणून ‘ती’ आता स्वत:ची लिंगबदल शस्त्रक्रिया (Sex Change Operation) करून ‘तो’ बनली आहे. प्रयागराजच्या मोतीलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वरूपराणी नेहरू रुग्णालयातल्या डॉक्टर्सकडून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या संदर्भातलं वृत्त ‘ टीव्ही नाइन हिंदी ’ने दिलं आहे. प्रयागराज इथल्या दोन तरुणींनी (Lesbian Couple) आयुष्यभर सोबत राहण्याच्या निर्णय घेतला आहे. दोन्ही कुटुंबांना मात्र त्यांचं हे समलैंगिक नातं मान्य नव्हतं. त्यामुळे दुसरा पर्याय शोधून त्यापैकी एकीने लिंगबदल शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबला. याआधी तरुणीची मानसिक चाचणी करून लिंगबदलासाठी ती आनंदी आणि मानसिकदृष्ट्या तयार आहे की नाही, याची पडताळणी केली गेली. चाचणीचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, तरुणीच्या लिंगपरिवर्तनानंतर त्या तरुणीला पूर्णपणे पुरुष बनण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागू शकेल. New Labour Code: नोकरी सोडल्यानंतर दोन दिवसात मिळणार फुल अँड फायनलचे पैसे, अजूनही अनेक फायदे दोन्ही तरुणी प्रयागराजमध्ये गंगा नदीच्या परिसरात वास्तव्यास आहेत. दोघी एकमेकींवर खूप दिवसांपासून प्रेम करायच्या. दोघींपैकी एकीने तिच्या कुटुंबीयांना याबाबत सांगितलं. तेव्हा या नात्याला त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तरुणीने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एसआरएन रुग्णालयात जाऊन तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला व या संदर्भातल्या प्रक्रियेला सुरुवात केली. Nepal Bans Pani Puri: नेपाळमध्ये पाणीपुरी विक्रीवर बंदी, काय आहे संपूर्ण प्रकरण? लिंगबदल शस्त्रक्रिया करणारे डॉ. मोहित जैन यांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर तरुणीची मानसिक चाचणी केली गेली. मुलगी म्हणून जगण्यासाठी ती इच्छुक नव्हती. लिंगबदल करण्याची तिची स्वत:ची इच्छा असल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. लिंगबदल करून पुरुष करायचं म्हटलं, की फक्त शारीरिक बदल करून चालत नाही, तर त्या व्यक्तीच्या हावभावातही बदल करावे लागतात. लिंगबदलानंतर त्या तरुणीला टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन थेरपी (Testosterone Hormone Therapy) देण्यात येईल. यातून तिचं पौरुषत्व वाढवलं जाईल. दाढी, मिशा वाढवण्यासाठीही प्रयत्न केले जातील. डॉक्टरांच्या मतांनुसार, तिच्यावर आता पहिली शस्त्रक्रिया झाली आहे. आता उपचारांची ही प्रक्रिया 18 महिना चालेल व त्यानंतर पूर्ण होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.