मुंबई, 26 जून- साऊथ अभिनेत्री (South Actress) रश्मिका मंदनाने (Rashmika Mandanna) फारच कमी वेळेत आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. तिला फारच कमी वयात प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अभिनेत्रीला ‘नॅशनल क्रश’ म्हणून देखील ओळखलं जातं. ‘पुष्पा’ या चित्रपटातून रश्मिका आता जगभरात लोकप्रिय झाली आहे. चाहत्यांना तिच्याबाबत अपडेट्स जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. सध्या अभिनेत्री एका आगळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. पाहूया काय आहे ते कारण. मराठी इंडस्ट्री असो, बॉलिवूड असो किंवा साऊथ या प्रत्येक कलाकरांबाबत काही चकित करणाऱ्या गोष्टी चाहत्यांना ऐकायला मिळत असतात. या गोष्टी अशा असतात ज्या सर्वसामान्यांसाठी फारच दुर्मिळ असतात. त्यामुळे प्रत्येकालाच या गोष्टींचं आश्चर्य वाटत असतं. अशीच एक गोष्ट रश्मिका मंदनाबाबत समोर आली आहे. अभिनेत्रीने चक्क आपल्या पाळीव डॉगीसाठी विमानाचं तिकीट मागितल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे सर्वच चकित झाले आहेत. एका मीडिया रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं होतं की, अभिनेत्री रश्मिका मंदनाने आपल्या निर्मात्यांकडे आपल्यासोबतच आपल्या डॉगीसाठीसुद्धा विमानाचं तिकीट मागितलं आहे. कारण अभिनेत्रीचा हा लाडका डॉग तिच्याशिवाय राहत नाही. आणि रश्मिका सर्वत्र त्याला सोबत घेऊन जात असते. त्यामुळे तिने निर्मात्यांकडे ही मागणी केली आहे. **(हे वाचा:**
मलायकाने BF अर्जुनाच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी निवडलं ‘हे’ ठिकाण; समोर आले रोमँटिक PHOTO
) रश्मिका मंदनाचं स्पष्टीकरण- या रिपोर्टवर स्पष्टीकरण देण्यासाठी अभिनेत्रीने काही ट्विट केले आहेत.या ट्विटमध्ये रश्मिकाने म्हटलं आहे, ‘‘इतके स्वार्थी बनू नका… जर तुम्हीसुद्धा माझा आणि ऑराचा (पाळीव डॉग) एकत्र प्रवास घडवून आणायचं ठरवलं तर ते शक्य नाही…कारण तिला प्रवास करायचा नाहीय… ती हैद्राबादमध्ये खूप आनंदी आहे.. परंतु या बातमीने माझा दिवस मजेशीर बनवला..मला माझं हसू आवरणं कठीण झालं आहे’.. असं म्हणत अभिनेत्रीने या रिपोर्टमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. आपण कोणाकडेही ऑरासाठी विमानाचं तिकीट मागितलं नाहीय. अर्थातच ही एक अफवा आहे हे स्पष्ट झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







