मुंबई, 20 जून : माणूस कितीही हुशार असला कितीही संयमी असला, तरी देखील बऱ्याचदा त्याच्यासोबत अशा काही गोष्टी घडतात की तेव्हा त्याला त्याचंच भान रहात नाही. असंच काहीस एका महिलेसोबत घडलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना फारच आवडला आहे. या व्हिडीओमधील महिला ही भिंतीला रंग काढताना दिसत आहे. ती मन लावून आपलं काम करत असते आणि ती आपल्या कामात इतकी व्यस्त होते की भिंतीवर पडत असलेली सावली तिच्या लक्षात येत नाही. महिला भिंतीला रंग लावत असताना त्यावर शिड्यांच्या खांब्याची सावली पडली असते. पण तिच्या ते लक्षात येत नाही. महिला आधी रंग घेते आणि भिंतीला लावते. पण तरी तो रंग काही सारखा होत नाही. मग महिला वारंवार तिथे रंग लावण्याचा प्रयत्न करते आणि भिंत ठिक करण्याचा प्रयत्न करते. परंतू त्या भिंतीला तर काहीच झालेलं नसतो, तो भ्रम फक्त त्या महिलेच्या मनात निर्माण होतो. ज्यामुळे ती खूपच त्रस्त दिसते.
OMG 🤣pic.twitter.com/a3g9RaFyld
— Figen (@TheFigen_) June 16, 2023
महिलेचा हा सगळा प्रकार तिच्या मागे उभी असलेली व्यक्ती आपल्या कॅमेरामध्ये कैद करते. व्हिडीओत पुढे काय घडलं हे कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ अर्ध्यावरच थांबवला गेला आहे. पण हा व्हिडीओ खरोखरच खूप मनोरंजक आहे. खरंतर या व्हिडीओमधील महिलेसोबत जे घडलं ते बहुसांश वेळा सर्वांसोबतच घडतं. जेव्हा माणसाचा मेंदू काम करणं बंद होतं. अशावेळेस बऱ्याचदा आपल्या बाजूला वस्तू असून देखील त्याचा विसर पडतो किंवा दिसत नाहीत, तर कधी आपण काय करतोय असंच काहीसं या महिलेसोबत घडलं, लोकांना हा व्हिडीओ त्यांच्यासारखाच वाटला म्हणून तो जोरदार ट्रेंड होत आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक करत आहेत.