मुंबई 03 फेब्रुवारी : सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही, एका मागून एक असे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात की ते पाहाण्यात लोकांचा वेळ कसा जातो. हेच लोकांना कळत नाही. येथे मनोरंजक व्हिडीओ ते आर्ट, क्राफ्ट सारख्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात.
सध्या सोशल मीडियावर एक मनोरंजक व्हिडीओ समोर आला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल.
या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने लोकांच्या मनोरंजनासाठी फाडू जुगाड केला आहे. अनेकदा असे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण या व्हिडीओमधील दुकानदाराची रिएक्शन आणि एक्प्रेशन पाहता हा विनोदी व्हिडिओ आहे असे वाटत नाही.
खरंतर या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुकानदाराच्या नकळत त्याच्या कानशिलात वाजवते आणि तेथून पळ काढते. या ठिकाणी नक्की काय झालं, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
Did not see where it came from pic.twitter.com/wNObcYkoKj
— Fun Viral Vids 😊 (@Fun_Viral_Vids) January 29, 2023
या व्हिडीओमध्ये एका दुकानात तीन लोक उभे असल्याचे दिसत आहे. त्यापैकी पांढर्या टी-शर्टमध्ये एक दुकानदार आहे. त्याचवेळी बाजूला उभी असलेली व्यक्तीही ग्राहक असल्याचे दिसते. तिसरा, जुगाड मारणारी व्यक्ती आहे. हे दुकान सिगारेटचे दुकान असल्याचे दिसत आहे.
त्यावेळी समोरील व्यक्ती ही संधीचा फायदा घेते. दुकानात प्रवेश केल्यानंतर ती व्यक्ती हुक्का किंवा सिगार मागतो. यानंतर ती व्यक्ती पहिला पफ घेते. मग तोंडातून धूर बाहेर काढू लागतो. त्यावेळी दुकानदाराला व्यक्तीची ही कृती आवडत नाही. तो या व्यक्तीला असे न करण्याचा सल्ला देतो.
तेव्हाच ही व्यक्ती दुकानदाराला धडा शिकवण्याचा विचार करते. यानंतर तो पुन्हा सिगरेट ओढतो, त्याचा समोर धूर करतो आणि यामध्येच दुकानदाराच्या कानशिलात लगावून पळून जातो.
हा व्हिडीओ मुद्दाम तयार केला गेला आहे की खरा आहे हे कळू शकलेलं नाही. पण हा व्हिडीओ पाहून लोक पोट धरुन हसू लागले आहेत. हा व्हिडीओ खूपच मनोरंजक आहे. यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Comedy, Funny video, Social media, Top trending, Videos viral, Viral