मराठी बातम्या /बातम्या /Viral /

समुद्रात गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला खरा पण, त्यानंतर जे घडलं ते... पाहा Video

समुद्रात गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेला खरा पण, त्यानंतर जे घडलं ते... पाहा Video

व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ व्हायरल

प्रत्येक प्रियकराची इच्छा असते की, जेव्हा तो गर्लफ्रेंडला प्रपोज करेल, तेव्हा हा क्षण खास असावा आणि तो आयुष्यभर लक्षात राहावा, असाच प्रयत्न या तरुणाचा होता, पण घडलं काही भलतंच

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 29 नोव्हेंबर : सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमी असे काही व्हिडीओ समोर येत असतात, जे खूपच धक्कादायक असतात. तर काही असे व्हिडीओ देखील असतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. तसेच येथे काही मनोरंजक व्हिडीओ देखील असतात. लोकांच्या आयुष्यात असे काही किस्से होत असतात, जे ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला हसावं की त्या तरुणासाठी दुखं व्यक्त करावं हेच कळणार नाही.

हे ही पाहा : Viral Video : CCTV मध्ये ही घटना कैद झाली नसती तर, तुमचा विश्वासच बसला नसता

प्रत्येक प्रियकराची इच्छा असते की, जेव्हा तो गर्लफ्रेंडला प्रपोज करेल, तेव्हा हा क्षण खास असावा आणि तो आयुष्यभर लक्षात राहावा. काही लोक हे संस्मरणीय बनवण्यासाठी आपल्या मित्रांची मदतही घेतात. असंच काहीसं एका तरुणाने करण्याचं ठरवलं आणि तो आपल्या गर्लफ्रेंडला बोटीमधून समुद्रात घेऊन गेला. तेथे त्याचे मित्र देखील त्याच्यासोबत होते, जे या क्षणांना आपल्या फोनमध्ये कैद करत होते.

त्यामुळे या तरुणासोबत असा विचित्र प्रकार घडला की तुम्हाला नक्की काय रिएक्शन द्यावी हे कळणार नाही

खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक कपल बोटीवर उभ असल्याचं दिसत आहे. आधी ते एकमेकांना किस्स करतात आणि मग नंतर डान्स करतात. ज्यानंतर तो तरुण गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी पायावर बसत असतो, त्यावेळी तो आपल्या खिशामधून रिंग बॉक्स काढतो, पण तेवढ्यात हा बॉक्स खाली पाण्यात पडतो. हे पाहाताच तरुण देखील त्यासाठी पाण्यात उडी मारतो. सुदैवाने पाणी खोल नसल्याने तरुणाला ती अंगठी मिळते.

हा सगळा प्रकार पाहून त्याच्या गर्लफ्रेंडला आपलं हसू आवरत नाही, तर सोबतच या तरुणाचे मित्र देखील पोट धरुन हसू लागतात. यात चांगली गोष्ट अशी की या तरुणाने हार न मानता, तो पुन्हा बोटीवर आला आणि त्याने आपल्या गर्लफ्रेंडला पुन्हा अंगठी घातली आणि प्रपोज देखील केलं.

बाकी कोणत्या गोष्टीमुळे या जोडप्याला हा दिवस लक्षात राहो न राहो, पण या अंगठीच्या किस्यामुळे हा दिवस नक्कीच सगळ्यांच्या लक्षात राहिल.

First published:

Tags: Funny video, Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral