मराठी बातम्या /बातम्या /Viral /वरमाला घालताना असं काही घडलं की, ही जोडपी आयुष्यभर लक्षात ठेवतील, Watch Video

वरमाला घालताना असं काही घडलं की, ही जोडपी आयुष्यभर लक्षात ठेवतील, Watch Video

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हा एक कॉमेडी व्हिडीओ आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या ५ लग्नांची कहाणी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई १६ नोव्हेंबर : सोशल मीडियावर कधी काय समोर येईल याचा काही नेम नाही. येथे मनोरंजक तसेच कधीकधी धक्कादायक व्हिडीओ देखील समोर येत असतात. सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे, त्यामुळे लग्नाशी संबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

हा एक कॉमेडी व्हिडीओ आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या ५ लग्नांची कहाणी आहे.

या व्हायरल व्हिडीओ लग्नादरम्यान नवरा-नवरीची होणाऱ्या फसवणूकी संदर्भातील आहे. यामध्ये पहिल्या क्लिपमध्ये वरमाळा घालताना नववधू थोडी नाटक करायला जाते. परंतू तिला हे महागात पडतं, कारण असं करत असताना तिचा तोल जातो आणि ती खाली पडते.

हे ही पाहा : लग्नापूर्वी नववधू गुपचुप करत होती अशी गोष्ट, संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये कैद...

तर पुढच्या व्हिडीओमध्ये वरमाला घातल्यानंतर नववधूसोबत एक घटना घडते, ज्यामध्ये ती पडते, पण तिचं नशीब चांगलं असतं की तिचा नवरा तिला सांभाळून घेतो.

" isDesktop="true" id="787111" >

त्याच्या पुढच्या दोन क्लिपमध्ये नववधू आणि नवरदेवाचं जबरदस्ती लग्न होत असल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये ते लग्न करताना किंवा लग्नाच्या कोणत्याही विधी करताना खूश दिसत नाहीयत, त्यावेळी त्यांच्यासोबत काय घडतं? हे देखील फारच मनोरंजक आहे.

तर या व्हिडीओमधील शेवटच्या क्लीपमध्ये तर सगळीच हद्द पार होते. यामध्ये नवरदेव नववधूला वरमाला न घालता, सरळ तिच्या जवळ उभ्या असलेल्या तिच्या बहिणीला म्हणजेच स्वत:च्या मेहूणीला घालतो.

हा व्हिडीओ लग्नातील काही मनोरंजक क्षणांचा आहे. जो पाहाताना तुम्हाला देखील मजा येईल. हा व्हिडीओ युट्यूबवर Q Turn नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो लाकंना फारच आवडला आहे.

First published:
top videos

    Tags: Social media, Top trending, Videos viral, Viral