मुंबई १६ नोव्हेंबर : तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्नाचा सिझन सुरु झाला आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया ओपन केला तरी देखील आपल्याला लग्नाशी संबंधी वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी लग्नातील काही विशेष क्षणांचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो लग्नाशी संबंधीत आहे आणि तो नेटकऱ्यांना फारच आवडला आहे. लग्नाच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा वधू-वर तयार होतात तेव्हा ते एकमेकांना पाहण्यासाठी उत्सुक असतात. लग्नाच्या दिवशी वधू-वरांचा आनंद पाहण्यासारखा असतो. हे ही पाहा : Baby Elephant मालकावर झोपला आणि… हा Video जितका क्यूट तितकाच धोकादायक या दिवशी दोघांनाही प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असतो. जेव्हा नवरदेव वरात घेऊन वर लग्नमंडपात पोहोचते तेव्हा वधूच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो. यावेळी ती असा विचार करत असते की तिच्या स्वप्नातील राजकुमार तिला घेऊन जायला येत आहे आणि ती तशाच पद्धतीने त्याला इमॅजीन करु लागते. असंच काहीचं काहीसं या व्हिडीओमधील नववधूनं केलं. त्याचा व्हिडीओ जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.
याव्हिडीओमध्ये नववधू दिसत आहे जी नवरदेवाची वरात पाहात आहे ते ही खिडकीतून गुपचुप, तिला हे कोणालाही कळू द्याचं नव्हतं, पण अखेर तिची ही चोरी पकडली गेलीच. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडीओ खरंच पाहाण्यासारखा आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वर वऱ्हाड्यांसह नवरदेव लग्नमंडपात प्रवेश करत आहे, तेव्हा वधू बाल्कनीत उभी आहे आणि खूप आनंदी आहे. मात्र, या काळात तिला कोणी पाहू नये, अशीही तिची इच्छा आहे.
आपल्या होणाऱ्या नवऱ्याला पाहाताना नववधूच्या चेहऱ्यावरचं तेज पाहाण्यासारखंच आहे. हा व्हिडीओ इस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.