जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मनाचा मोठेपणा! नवरीनं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सवतीसाठी दान केली किडनी

मनाचा मोठेपणा! नवरीनं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सवतीसाठी दान केली किडनी

मनाचा मोठेपणा! नवरीनं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सवतीसाठी दान केली किडनी

नवरीनं लग्नानंतर दोन दिवसातच आपली किडनी (Bride Donated her Kidney) नवऱ्याच्या पहिल्या पत्नीला दान केली आहे. डेबीसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाही जिमचं आपल्या पहिल्या पत्नी मायलेनसोबत अत्यंत चांगलं नातं होतं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 19 जून : आपण पाहतो, की लग्नामध्ये नवरीसाठी (Bride) बहुतेकदा अनेकजण भरपूर भेटवस्तू घेऊन येतात. मात्र, आता समोर आलेल्या घटनेमध्ये नवरीनंच आपल्या लग्नाच्या (Marriage) दिवशी एक अनोखं गिफ्ट दिलं आहे. या नवरीनं आपल्या नवऱ्याच्या पहिल्या पत्नीला असं गिफ्ट दिलं आहे, जे खूपच कमी लोकं दुसऱ्याला देऊ शकतात. या नवरीनं लग्नानंतर दोन दिवसातच आपली किडनी (Bride Donated her Kidney) नवऱ्याच्या पहिल्या पत्नीला दान केली आहे. ही घटना फ्लोरिडामधील आहे. पराभवानंतरही तब्बल 40 वर्ष कायम होता मिल्खा सिंग यांचा ‘तो’ रेकॉर्ड फ्लोरिडामध्ये डेबी नील-स्ट्रिकलँड नावाच्या नवरीनं लग्नगाठ बांधल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात हे महान काम केलं आहे. डेबी आणि जिम स्ट्रिकलँड मागील एका दशकापासून सोबत आहेत. डेबीसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाही जिमचं आपल्या पहिल्या पत्नी मायलेनसोबत अत्यंत चांगलं नातं होतं. ते दोघं आपल्या मुलांसाठीचं कर्तव्यही अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडत होते. मात्र, डेबी आणि मायलेन या एकमेकींच्या अधिक जवळ नव्हत्या. मात्र, दोघींनाही एकमेकींबाबत काही तक्रारही नव्हती. सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? मग हे वाचाच; अन्यथा भरावा लागेल आर्थिक भुर्दंड मायलेन बऱ्याचा काळापासून किडनीच्या आजाराची सामना करत होती. तिची किडनी केवळ आठ टक्के सामान्य क्षमतेनं काम करत होती. किडनी ट्रान्सप्लांटशिवाय तिची जिवंत राहाण्याची शक्यता खूपच कमी होती. विशेष बाब म्हणजे जेव्हा डोनर मॅच केला गेला तेव्हा, मायलेनचा आपल्या भावासोबत मॅच झाला नाही. मात्र, डेबीसोबत मॅच झालं. डेबीनं मायलेनची स्थिती पाहता, हसत हसत आपल्या किडनी दान करण्याची तयारी दर्शवली. विशेष बाब म्हणजे, लग्नानंतर केवळ 48 तासातच डेबीनं आपली किडनी दान करत मायलेनचा जीव वाचवला. डेबीनं सांगितलं, की हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात