नवी दिल्ली 01 जानेवारी : सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. यात नवरी आणि नवरदेवासोबत अनेकदा वहिनी आणि दिराचे डान्स व्हिडिओ तसंच मेहुणी आणि दाजीचे मजेशीर कारनामे यांचाही समावेश असतो. सध्या एका लग्नातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मात्र, सोबतच ही तरुणी नेमकी करत काय होती? असा प्रश्नही तुम्हाला पडेल.
प्रेमविवाहानंतर पहिल्याच रात्री समोर आलं पत्नीचं धक्कादायक सत्य, नवरदेवाची थेट पोलिसांत धाव
लग्नसमारंभात असे अनेक क्षण येतात जेव्हा लोक आपल्या अनोख्या अंदाजाने किंवा अजब कृत्याने सगळ्यांचंच लक्ष वेधतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मात्र अतिशय अजब दृश्य पाहायला मिळतं. यात नवरीऐवजी नवरीची बहिणीच नवरदेवासोबत असं काही करते, जे पाहून उपस्थित सगळेच थक्क होतात. यात नवरीच्या बहिणीने आपल्या दाजीसोबत केलेलं कृत्य पाहून नेटकरीही खळखळून हसू लागले.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेवाच्या मेहुण्या त्याच्या शेजारीच उभा आहेत. यातील एक मेहुणी नवरदेवाला मिठाई खाऊ घालण्यासाठी पुढे येते. ती नवरदेवाला रसगुल्ला भरवत असते. मात्र नवरदेव रसगुल्ला खाऊ लागताच मेहुणी अगदी क्षणात नवरदेवाच्या जवळ जाते आणि तो रसगुल्ला स्वतःच खाते.
...अन् स्टेजवरच धाडकन कोसळले नवरी-नवरदेव; तो क्षण कॅमेऱ्यात कैद, काय झालं पाहा..VIDEO
ashiq.billota नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमधील सर्वात मजेशीर बाब म्हणजे, मेहुणी रसगुल्ला खाऊ लागताच नवरदेव तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही उपयोग होत नाही आणि मेहुणीच हा रसगुल्ला खाते. हा मजेशीर व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून आतापर्यंत 6 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Wedding video