मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट; लग्नात तरुणांनी घातला धुडगूस, VIDEO पाहून हादराल!

अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट; लग्नात तरुणांनी घातला धुडगूस, VIDEO पाहून हादराल!

असे जीवघेणे स्टंट चुकूनही करू नका...

असे जीवघेणे स्टंट चुकूनही करू नका...

असे जीवघेणे स्टंट चुकूनही करू नका...

  • Published by:  Meenal Gangurde
जालोर, 24 जुलै : राजस्थानमधून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. राजस्थानमध्ये जीवघेणं स्टंट (Deadly Stunts) समोर आलं आहे. स्टंट करणाऱ्यांचा थोडासा निष्काळजीपणा या तरुणांच्या अंगाशी आला असता. आणि याची किंमत संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागू शकली असती. (Horrible stunts ) इतकच नाही तर यादरम्यान जर कोणतीही गाडी समोरून आली असती तर अपघात होऊ शकला असता. रात्रीच्या वेळी अनेकदा अशा प्रकारचे स्टंट  केले जातात. यावर पोलिसांकडून वारंवार कारवाईही केली जाते. मात्र तरीही तरुण जीवावर बेतून अशा प्रकारचे स्टंट करीत आहेत. ही घटना राजस्थानमधील (Rajasthan News) आहे. हे ही वाचा-VIDEO : चालता चालता मंत्री पायऱ्यांवरुन पडले; गेटवरील महिला अधिकारीलाच फटकारलं मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडीओमधील तरुण लग्नाच्या कार्यक्रमासाठी जात आहेत. हे तरुण दारू पिऊन हे प्राणघातक स्टंट करीत आहेत. व्हिडिओमध्ये, तरुण दोन वेगवान वाहनांच्या दरवाज्याबाहेर लटकवून डीजेच्या सुरात नाचत आहेत. एवढच नव्हे तर चालत्या वाहनाच्या खिडकीतून बाहेर येऊन तरुण प्राणघातक स्टंट करीत आहेत. जवळजवळ धावणारी वाहने देखील एकमेकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहताना लक्षात येतं की, वाहन चालकाची एकही चूक जीवावर बेतू शकते.
First published:

Tags: Marriage, Shocking viral video, Video viral

पुढील बातम्या