जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video: ..अन् स्टेजवरच नवरी-नवरदेव आपसात भि़डले; कारण जाणून खळखळून हसाल

Viral Video: ..अन् स्टेजवरच नवरी-नवरदेव आपसात भि़डले; कारण जाणून खळखळून हसाल

गळ्यात हार घालताना आपसात भिडले (प्रतिकात्मक फोटो)

गळ्यात हार घालताना आपसात भिडले (प्रतिकात्मक फोटो)

सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधू आणि वर एकमेकांना आधी हार घालण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 जून : लग्नाचा सीझन असो वा नसो, सोशल मीडियावर एक गोष्ट कायम पाहायला मिळते. ते म्हणजे लग्नाशी संबंधित मजेदार व्हिडिओ, जे इंटरनेट जगतात व्हायरल होत राहतात. जे लोक फक्त बघतच नाहीत तर त्याला पसंतीही दर्शवतात. या व्हिडिओंमध्ये अनेकवेळा वऱ्हाडी मजेशीर कृत्ये करतात, तर कधी वधू-वराचे गोंडस क्षण व्हायरल होतात. हेच कारण आहे, की या प्लॅटफॉर्मवर जेव्हा जेव्हा वधू-वरांशी संबंधित व्हिडिओ शेअर केला जातो तेव्हा तो लगेच व्हायरल होतो. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. Wedding Video Viral : वाजतगाजत वरात घेऊन मंडपात आला; वधूपक्षाने नवरदेवाला बांधलं झाडाला कारण… भारतात लग्नात अनेक प्रकारचे महत्त्वाचे विधी केले जातात. जयमाला त्यापैकीच एक. या निमित्ताने दोन्हीकडील पाहुण्यांमध्ये हशा-विनोद सुरू असतो आणि अनेक रंजक प्रसंग घडतात. या विधीच्या वेळी अनेकदा असं घडतं की वर तोंड फुगवून बसतो, तर कधी कधी वधूचं रागावलेलं रूप दिसतं. तर, कधी-कधी इथे एकमेकांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते. सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधू आणि वर एकमेकांना आधी हार घालण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.

जाहिरात

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, की वधू-वरांना पुष्पहार घालण्याचा सोहळा सुरू आहे. वराला त्याच्या एका नातेवाईकाने उचलून घेतलेलं असताना वधू त्याला हार घालण्याचा प्रयत्न करत आहे. पण वधू इथे शेवटपर्यंत हार मानत नाही. दोघंही अगदी आपसात भिडतात. मात्र, शेवटी नवरदेवच नवरीला आधी हार घालतो. दोघांना अशाप्रकारे भिडताना पाहून यूजर्स मजा घेत आहेत. official__wedding_photogr नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. वृत्त लिहेपर्यंत 58 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया कमेंट करून दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात